TVS Jupiter 110 launched 2024 with 6 colours टीव्हीएसची नवी ज्युपिटर 110
TVS मोटर कंपनीने आपली TVS Jupiter 110 ही भारतीय बाजारात लाँच केली आहे. या स्कूटरबद्दल 5 खास फीचर्स आहेत. ते ग्राहकांना माहित असणे आवश्यक आहे. अन्यथा त्यांना पश्चाताप करण्याची वेळ येऊ शकते. गाडी खरेदी करताना त्याची परिपुर्ण माहिती घेणे हे ग्राहकाचे कर्तव्य असते. या गाडीला अतिशय आकर्षक डिझाइन देण्यात आले आहे. यामध्ये पूर्णपणे पुन्हा डिझाइन केलेले फ्रंट एप्रन आहे. यात एलईडी लाइट बार आणि टर्न इंडिकेटर चा समावेष आहे. हे एलईडी हेडलॅम्प आणि अनेक नवीन कलर ऑप्शनने सुसज्ज आहे. या गाडीची किंमत 73,700 रुपये आहे.
TVS Jupiter 110 मध्ये इंधन इंजेक्शन तंत्रज्ञानासह नवीन 113.3 सीसी एअर-कूल्ड इंजिन आहे. हे इंजिन 5,000 आरपीएम वर 7.91 बीपीएम ची कमाल पॉवर आणि त्याच आरपीएम वर 9.2 एनएम टॉर्क निर्माण करते. हे सीव्हीटी ऑटोमॅटिक ट्रान्समिशन राखून ठेवते. इलेक्ट्रिक असिस्ट समाविष्ट करते जे टॉर्क आउटपुट 9.8 एनएम पर्यंत वाढवते. TVS Jupiter 110 हे 82 किमी/तास स्पीडने चालवले जाऊ षकते, हे ग्राहकांना माहित असणे आवश्यक आहे.
TVS Jupiter 110 मध्ये दोन हेल्मेट स्लॉट्ससह अंडरसीट स्टोरेज, मोबाईल डिव्हाइस चार्जिंगसाठी यूएसबी पोर्ट, एक्सटर्नल इंधन फिलर कॅप आणि एलईडी लाइटिंग आहे. या शिवाय डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टरसह उपलब्ध आहे. ज्यामध्ये अप्लिकेशन सपोर्टसह ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी आहे. टीव्हीएसने इमर्जन्सी स्टॉप सिग्नल्स, ऑटोमॅटिक टर्न इंडिकेटर, डिस्टन्स-टू-इम्प्टी फीचर, व्हॉईस कमांड फंक्शनॅलिटी, हॅझर्ड लॅम्प्स आणि फॉलो-मी हेडलॅम्प देखील लाँच केले आहेत.
ज्युपिटर 110 आकार आणि वजन
TVS Jupiter 110 ची लांबी 1848 मिमी, रुंदी 665 मिमी, उंची 1158 मिमी आहे. त्याचा व्हीलबेस 1275 मिमी आहे आणि सीटची लांबी 756 मिमी आहे. पेट्रोलसह त्याचे एकूण वजन 105 किलो आहे. तसेच टीव्हीएसने ज्युपिटर 110 डॉन ब्लू मॅट, गॅलेक्टिक कॉपर मॅट, टायटॅनियम ग्रे मॅट, स्टारलाईट ब्लू ग्लॉस, लूनर व्हाईट ग्लॉस आणि मेटिअर रेड ग्लॉस कलर स्कीममध्ये लाँच केले आहे.
व्हेरिएंट आणि किंमत
ज्युपिटर 110 4 व्हेरिएंटमध्ये उपलब्ध आहे ड्रम, ड्रम अलॉय, ड्रम एसएक्ससी आणि डिस्क एसएक्ससी. त्यांची किंमत 73,700 रुपयांपासून सुरू होते आणि 87,250 रुपयांपर्यंत जात असून या दोन्ही किंमती एक्स-शोरूम आहेत.