कुटेंच्या बोगस कंपन्यांचे जाळे, ज्ञानराधातला पैसा थेट हाँगकाँगला
-ईडीच्या तपासातून समोर , कुटेची दीड कोटींची मालमत्ताही जप्त
कुटेंच्या बोगस कंपन्यांचे जाळे, ज्ञानराधातला पैसा थेट हाँगकाँगला
-ईडीच्या तपासातून समोर , कुटेची दीड कोटींची मालमत्ताही जप्त
बीड : ज्ञानराधाचे सुरेश कुटे यांनी देवीदारांच्या पैशावर डल्ला मारल्याने त्यांच्या आडचणी वाढ झाली आहे. त्यांनी केलेले कारनामे समोर येत आहेत. त्यांची ईडीकडून तपासणी केली त्यातून जे समोर आले ते भयानक आहे. सुरेश कुटे यांनी बोगस कंपन्यांचे जाळे निर्माण करुन ज्ञानराधा पतसंस्थेतील लोकांचे पैसे, थेट हाँगकाँगला लाँडरिंग केल्याचे सक्तवसुली संचालनालय म्हणजचे ईडीच्या तपासातून समोर आली आहे. ईडीने ज्ञानराधा पतसंस्थेवर केलेल्या छापेमारीनंतर कुटेची दीड कोटींची मालमत्ताही जप्त केली आहे.
कुटे ग्रुपचे बीड जिल्ह्यात मोठे प्रस्थ असून नोव्हेंबर २०२३ मध्ये प्राप्तीकर विभागाने छापेमारी केली होती. यानंतर कुटेंच्या ज्ञानराधा पतसंस्थेत ठेवी काढण्यासाठी मोठी गर्दी झाल्यानंतर पतसंस्था आर्थिक अडचणीत सापडली होती. यानंतर कुटे यांच्यावर ४२ गुन्हे दाखल केले आहेत. त्यासंदर्भात आर्थिक गुन्हे शाखा याचा तपास करीत आहे. कुटे व संचालक आशिष पाटोदकर यांच्यासह ४ कर्मचारी अटकेत आहेत. आर्थिक गुन्हे शाखेने कुटे व आशिष पाटोदकर यांच्या मालकीची ५ हजार ७६५ कोटी २४ लाख २० हजार रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे. तपासात कुटेंच्या राज्यात २३८ मालमत्ता आढळून आल्या असून राज्याबाहेरच्या त्याच्या मालमत्तांचा शोध घेतला जात आहे.
सरसकट बारकाल्या मुलांना पगार सुरू करा – भोऱ्याची मुख्यमंत्री शिंदेकडे मागणी
गुलाबी जॅकेट घालून दिसतो छान, काकाविषयी मनात घाण
उद्धव ठाकरेंमुळे विरोधकांचे जहाज बुडेल – आमदार संजय शिरसाट
३ हजार कोटींच्या ठेवी आडकल्या
बीड येथे मुख्य कार्यालय असलेल्या ज्ञानराधा पतसंस्थेच्या २२ शाखा बीड जिल्ह्यात आहेत. तर राज्यात ५२ शाखा आहेत. १ लाख ८५ हजार ८७२ जणांची १७९० कोटी १ लाख ३७ हजार ३३ रुपयांची मुदत ठेव आहे तर २ लाख ६ हजार ६९७ जण बचत खातेदार आहेत. ज्ञानराधा तपसंस्थेत एकूण ३ हजार ७१५ कोटी ५८ लाख रुपये अडकलेले आहेत.
ईडीची माहिती
ईडीच्या माहितीनुसार कुटे व यशवंत कुलकर्णी यांनी विविध शेल संस्थांमार्फत लेयरिंगद्वारे काढून टाकला. तसेच भागभांडवल/गुंतवणूक म्हणून स्वत:च्या कंपनीच्या कुटे ग्रुपमध्ये सादर केला. त्यानंतर बोगस/शेल संस्थांचे जाळे तयार करुन हा निधी लेयरिंगद्वारे हाँगकाँगला पाठवला गेला आहे. कुटे यान पैशांतून संपत्ती खरेदी केल्याचे समोर आले आहे.