लाडका भाऊ योजनेसाठीचे फक्त हेच युवक पात्र

लाडका भाऊ योजनेसाठी अर्ज कसा आणि कुठे करावा? काय पात्रता आणि कोणते निकष? कोणाला किती पैसे मिळणार? जाणून घ्या सविस्तर!

0

लाडका भाऊ योजनेसाठीचे फक्त हेच युवक पात्र

लाडका भाऊ योजनेसाठी अर्ज कसा आणि कुठे करावा?

काय पात्रता आणि कोणते निकष?

कोणाला किती पैसे मिळणार? जाणून घ्या सविस्तर!

महाराष्ट्राच्या गृहिणींसाठी आर्थिक उन्नतीकरता “लाडकी बहीण” योजनेस राज्यभरातून चांगला प्रतिसाद मिळाले, त्यानंतर पंढरपुरात आषाढी एकादशी दिवशी विठ्ठलाच्या शासकीय महापूजेनंतर राज्यातील सुशिक्षित युवा बेरोजगारांसाठी कार्य प्रशिक्षण योजना म्हणून मुख्यमंत्री यांनी लाडका भाऊ योजना जाहीर केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हंटले कि ही योजना आधीचीच असून फक्त त्याचे नामांतर करून “लाडका भाऊ” करून सार्वत्रिक करण्यात आली आहे. “मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना – CM Youth Work Training Scheme” सन २०२४-२५ या आर्थिक वर्षापासून सुरु करण्यास मान्यता देण्यात येत आहे. 12वी पास, डिप्लोमा आणि पदवीधरांसाठी दरमहा विद्यावेतन देण्यात येणार आहे. लाडका भाऊ योजने अंतर्गत बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना महाराष्ट्र सरकार तर्फे दरमहा ६ हजार रुपये देण्यात येणार आहेत. तर डिप्लोमा धारक विद्यार्थ्यांना ८ हजार रुपये तसेच पदवीधर तरुणांना १० हजार रुपये स्टायफंड देण्यात येणार आहेत.

UPSC चेअरमन Manoj Soni यांनी दिला राजीनामा – हे दिले कारण
दररोज पोहण्याचे 8 फायदे पहाच
मुलांच्या दप्तराचे ओझे कधी कमी होणार?

१. “तरुण वर्षभर एखाद्या कारखान्यात अप्रेन्टिसशिप करावे लागणार, त्यानंतर तिथे त्याला कामाचा अनुभव आणि प्रमाणपत्र मिळेल आणि त्या अनुभवाच्या जोरावर त्याला नोकरी देखील मिळेल.”
२. लाडका भाऊ योजने अंतर्गत तरुण ज्या आस्थापना /कारखान्यात काम करेल तिथे त्यांच्यासाठी महाराष्ट्र सरकार पैसे भरणार असून या योजनेद्वारे बेरोजगारीवर उपाय योजना करून मात करण्यात येईल.
३. परंतु ही रक्कम सरसकट विद्यार्थ्यांना मिळणार नाही. जे विद्यार्थी कंपनीत अप्रेंटिसशिप करतील त्याच विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ घेता येईल. अप्रेंटिसशिप करणाऱ्या बारावी उत्तीर्ण, डिप्लोमा उत्तीर्ण आणि पदवीधर विद्यार्थ्यांना महाराष्ट्र सरकार स्टायफंड म्हणून प्रत्येक महिन्याला ठराविक रक्कम देणार आहे.
४. अप्रेंटिसची रक्कम स्वतः महाराष्ट्र सरकार देणार असून या योजनेची तीन भागांत वर्गवारी करण्यात आली आहे. तसेच या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी महाराष्ट्र सरकारच्या ऑफिशिअल वेबसाईटवर लिंक देण्यात येणार आहे.
५. पात्र उमेदवारांनी कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या https://rojgar.mahaswayam.gov.in/ या वेबसाईटवर नोंदणी करणे आवश्यक आहे. नोंदणी करताना नवीन युजरचा पर्याय निवडल्यावर त्यामध्ये नाव, पत्ता आणि वयोगट हि माहिती भरावी.
६. लाडका भाऊ योजनेसाठी उमेदवाराचे किमान वय १८ व कमाल वय ३५ वर्षे असणे आवश्यक आहे. उमेदवाराची शैक्षणिक पात्रता १२वी पास / आयटीआय/ पदवी/ पद्युत्तर असावी. मात्र शिक्षण चालू असलेले उमेदवार या योजनेत सहभाग घेऊ शकणार नाहीत.
७. तसेच उमेदवार हा महाराष्ट्राचा आदीवासी असावा. उमेदवाराची आधार नोंदणी असावी. उमेदवाराचे बँकेत खाते आधार संलग्नित असावे. यासोबत उमेदवाराने कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या https://rojgar.mahaswayam.gov.in/ या वेबसाईटवर नोंदणी करून रोजगार नोंदणी क्रमांक प्राप्त केलेला असावा.
८. योजनेचे कामकाज उदा. उमेदवारांची नोंदणी, आस्थापनांची नोंदणी, कार्यप्रशिक्षण व्यवसाय नोंदणी, उपस्थिती नोंदविणे, विद्यावेतन अदा करणे, प्रशिक्षण रुजू व समाप्ती अहवाल, अनुभव प्रमाणपत्र इ. बाबी ऑनलाईन पद्धतीने करण्यात येतील.
९. अर्ज केल्यास महाराष्ट्र सरकार ६ महिन्यांच्या प्रशिक्षणाचा लाभ देणार असून यासोबत स्टायफंड म्हणून पगार मिळू लागेल. तसेच या योजने अंतर्गत प्रशिक्षणार्थी महिन्यातून १० दिवस अथवा त्यापेक्षा जास्त दिवस गैरहजर राहिल्यास त्या महिन्याचे स्टायफंड मिळणार नाही. तसेच विद्यार्थी पहिल्याच महिन्यात प्रशिक्षण सोडून गेल्यास तो विद्यार्थी या योजनेसाठी पुन्हा पात्र राहणार नाही.

१०. यासाठी कोणकोण पात्र असणार, यासाठी कोणकोणती कागदपत्रं द्यावी लागणार याची माहिती समोर आली आहे.

• आधार कार्ड
• निवास प्रमाणपत्र
• पत्त्याचा पुरावा
• वय प्रमाणपत्र
• चालक परवाना
• शैक्षणिक पात्रता प्रमाणपत्र
• मोबाईल नंबर
• पासपोर्ट आकाराचे छायाचित्र
• बँक खाते पासबुक
• ई-मेल आयडी

Leave A Reply

Your email address will not be published.