ओबीसी आरक्षण बचाव यात्रेपासून लातुरच्या ओबीसींनी केला स्वत:चाच बचाव!

कार्यक्रमासाठी मोठी तयारी करून सुद्धा बहुतांश खुर्च्या रिकाम्याच

0

ओबीसी आरक्षण बचाव यात्रेपासून लातुरच्या ओबीसींनी केला स्वतःचाच बचाव!

कार्यक्रमासाठी मोठी तयारी करून सुद्धा बहुतांश खुर्च्या रिकाम्याच

लातूर : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला कुणबी म्हणून ओबीसी आरक्षणात समावेश करावी अशी मागणी घेऊन ते आंदोलन करीत आहेत. या मागणीला विरोध करण्यासाठी वंचितचे प्रकाश आंबेडकर हे ओबीसी आरक्षण बचाव यात्रेच्या माध्यमातून मराठा समाजाच्या कुणबी करणाला विरोध करीत मिळालेल्या नोंदी रद्द करण्याची मागणी करीत आहेत. ही यात्रा लातूर येथे आली असता ओबीसी आरक्षण बचाव यात्रेपासून ओबीसी समाजातील घटकांनी स्वतः बचाव केल्याने ही यात्रा लातूर सफसेल फेल ठरल्याचे दिसून आले आहे. या कार्यक्रमासाठी मोठी तयारी करून सुद्धा बहुतांश खुर्च्या रिकाम्या राहिल्याने आयोजकांवर मोठी नामुष्की ओढवली आहे.

चैत्यभूमी येथून सुरू झालेली ओबीसी आरक्षण बचाव यात्रा लातूर येथील गिरवलकर मंगल कार्यालयात आली होती. या यात्रेसाठी जिल्ह्यातील ओबीसी प्रवर्गात समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे यासाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने निमंत्रण पत्रिकेच्या माध्यमातून आवाहन केले होते. मात्र या यात्रेकडे ओबीसी बांधवांनी पाठ फिरवल्याने चर्चेला उधाण आले आहे.
यानंतर ही आरक्षण बचाव यात्रा बीड जिल्ह्याकडे मार्गस्थ झाल्यानंतर या यात्रेचे स्वागत भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी केल्याने ही यात्रा भाजप पुरस्कृत असल्याची चर्चा सुरू झाली. यानंतर पाटोदा येथे भाजपचे भट
माजी आमदार भीमराव धोंडे यांनी वंचितचे प्रकाश आंबेडकर यांचे स्वागत करण्यासाठी स्वतः गळ्यात ढोल लटकून तो बदडल्याची छायाचित्रे सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर ही यात्रा मराठा समाजाच्या आरक्षणाचा विरोध करण्यासाठी भाजपने सुरू केल्याच्या नव्या चर्चेला उधाण आल्याने या यात्रेपासून ओबीसी स्वतः बचाव करताना दिसत आहेत, असे बोलले जात आहे. त्यामुळेच की काय परभणी येथेही या यात्रेकडे ओबीसी बांधवांनी पाठ फिरवल्याने मोठी नामुष्की ओढावल्याचे दिसत आहे.

डाॅ. राजरत्न आंबेडकर यांचा जरागेंना पाठिंबा

मनोज जरांगे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त डाॅ. राजरत्न आंबेडकर यांनी भेट घेऊन त्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी बोलताना त्यांनी मराठा समाजाच्या कुणबी आरक्षणाला आपला पाठिंबा देऊन मी मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा देतो असे म्हटले. यावेळी त्यांनी ओबीसी आरक्षण बचाव यात्रेसंदर्भात बोलताना, मी देवेंद्र फडणवीस यांच्या इशा-यावर भूमिका बदलत नाही, असे म्हणत त्यांनी अॅड. प्रकाश आंबेडकर यांचे नाव न घेता टोला लगावला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.