काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण मनोज जरांगेंच्या भेटीला

-राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता

0

काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण मनोज जरांगेंच्या भेटीला

-राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता

छत्रपती संभाजीनगर :आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये राज्यात सुरू असलेल्या मराठा आंदोलनाचा सर्वाधिक फायदा हा महाविकास आघाडीतील उमेदवारांना झाल्याचा दिसून आले होते. त्यात आता पुन्हा विधानसभा निवडणुकीमध्ये देखील आंदोलनाचा फायदा महाविकास आघाडीला होईल, असे सांगितले जात आहे. त्यातच काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी आंतरवाली सराटीमध्ये जाऊन मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली. यामुळे राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

काँग्रेस नेते चव्हाण आणि मनोज जरांगे पाटील यांच्यात आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने चर्चा झाल्याचे सांगितले जात आहे. पृथ्वीराज चव्हाण यांनी मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळात मराठा समाजाला दिलेल्या आरक्षणासंदर्भात देखील या दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली. निवडणुकांपूर्वीच मनोज जरांगे पाटील यांनी आगामी निवडणुकीत उमेदवार उभे करण्याची घोषणा केली होती. मात्र याबाबतचा अंतिम निर्णय अद्यापपर्यंत जाहीर केला नाही. त्यात ही राजकीय भेट झाल्याने सध्या राजकीय राज्याच्या राजकारणात याची चांगलीच चर्चा सुरू झाली आहे.

फडणवीस यांनी राजीनामा द्यावा

पृथ्वीराज चव्हाण यांनी बदलापूर घटनेवरून राज्य सरकार तसेच गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करताना ते म्हणाले की, राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था राखण्यात फडणवीस यांना अपयश आले असून राज्यात सध्या विविध भागात गुन्हेगारी घटना घडत आहेत त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.