मद्य परवाना तपासणी होत नसल्याने मद्यपींची मजा
-अल्पवयीन मुलांच्या मद्य प्राशन करण्याच्या प्रमाणात वाढ
मद्य परवाना तपासणी होत नसल्याने मद्यपींची मजा
-अल्पवयीन मुलांच्या मद्य प्राशन करण्याच्या प्रमाणात वाढ
छत्रपती संभाजीनगर : राज्यात वर्धा, गडचिरोली हे जिल्हे वगळता महाराष्ट्रात कुठेही दारूबंदी नाही. मात्र मद्यप्राशन, मद्य बाळगणे व वाहतुकीसाठी २१ वर्षे वय व उत्पादन शुल्क विभागाचा परवाना बंधनकारक आहे. मद्य परवाना नसणाऱ्यांना ५ वर्षे शिक्षा व ५० हजारांपर्यंतचा दंड होऊ शकतो, असा कायदा आहे. मात्र नियमितपणे तपासणी होत नसल्याने कुठेही कोणीही परवाना घेण्याच्या भानगडीत पडत नसल्याने तसेच मद्य परवानाची तपासणी होत नसल्याने अल्पवयीन मुलांचे व इतर मद्यपीची मजा होताना दिसत आहे. यामध्ये मद्यप्राशन करण्याचे प्रमाण वाढत असल्याचे समोर आल्याने यातून गुन्हेगारी प्रवृत्तीला जोर मिळत असल्याचे समोर आले आहे.
निवडणुकीपूर्वी राज्यात मोठा भूकंप?
‘पंतप्रधान सूर्यघर मोफत वीज’ योजनेबाबत मोठी घोषणा
सोन्या-चांदीचे दर कमी होण्याची शक्यता
मागील २५ वर्षांत मद्य, पाणी यांच्या दरात मोठी वाढ झाली आहे. यामध्ये पाणी दुप्पट, बिअर अडीचपट, पेट्रोल चारपट महागले. आता मद्य परवाना अजूनही ५ रुपयांत मिळतो. मात्र हा परवाना सक्तीचा असल्याचे अनेकांना माहीतच नसल्याचे समोर आले आहे. परवाना नसताना मद्यनिर्मिती, त्याची वाहतूक किंवा जवळ बाळगणे तर परवाना असणाऱ्यांकडे निर्धारित क्षमतेपेक्षा अधिक मद्याचा साठा आढळल्यास कलम ६३ अन्वये कारवाई. ३-५ वर्षे कैद, २५-५० हजार दंड किंवा दोन्ही. वाहनही जप्त केले जाते. तसेच परमिट रूम, बार वगळता अन्य ठिकाणी मद्य पिणाऱ्यांवर कलम ८४ नुसार कारवाई. ५० हजारांपर्यंतचा दंड आकारला जातो.
गुजरातमध्ये १९४७ पासून दारूबंदी आहे. तिथे फक्त पंचतारांकित हॉटेलात परमिट रूम आहेत. पर्यटक, परदेशी नागरिक, अन्य राज्यातून आलेल्या नागरिकांना पुरावे दाखवून दारू मिळते. महाराष्ट्रात दारू खुली असताना ५० वर्षांत वाइन शॉपचा एकही नवा परवाना दिलेला नाही. दुसरीकडेच परवाने स्थलांतरित करून शहरात नवीन दुकाने उघडत आहेत. गुजरातेत स्थापनेपासून ७६ वाइन शॉप उघडले आहेत. बिहार व मिझोराममध्ये संपूर्णपणे बंदी, तर गुजरात, नागालँड, लक्षद्वीपमध्ये अटी-शर्तींसह परवाना मिळतो. गुजरातेत ७ प्रकारचे परवाने असून हेल्थ परमिटसाठी वय वर्षे ४०, आरोग्य प्रमाणपत्र, मासिक २५,००० उत्पन्नाची अट आहे.
प्रधानमंत्री आवास योजनेबाबत मोठी घोषणा
अर्थसंकल्पातून कॅन्सरग्रस्तांना मोठा दिलासा
महाराष्ट्रात ५० वर्षांत एकाही वाइन शॉपला परवानगी नाही, तरी परवाने स्थलांतरामुळे दुकाने वाढत आहेत. तर दारूबंदी असणाऱ्यां गुजरातमध्ये ६४ वर्षांत ७६ वाइन शॉप उघडले. परवान्यासोबतच बिअर व वाईनच्या सेवनासाठी २१ वर्षे तर हार्ड प्रकारातील मद्यासाठी २५ वर्षावरील वय आवश्यक आहे. या वयाखालील व्यक्तीस मद्य विक्री करणे किंवा परमीटरूममध्ये पिण्यासाठी बसू देण्यास परवानगी नाही. यासंदर्भात राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक संतोष झगडे म्हणाले की, राज्यात कायद्यानुसार मद्यसेवन, सोबत बाळगणे आणि वाहतूक करण्यासाठी परवाना सक्तीचा आहे. त्यामुळे दंड व शिक्षा टाळण्यासाठी परवाना काढायलाच हवा. ही प्रक्रिया ऑनलाईनही उपलब्ध आहे.
महसूल देण्यात संभाजीनगर पहिल्या क्रमांकावर
मद्यविक्रीतून महसूल देण्यात छत्रपती संभाजीनगर राज्यात पहिल्या क्रमांकावर आहे. यामध्ये २०२० पर्यंत आजीवन व वार्षिक परवाने उत्पादन शुल्क कार्यालयातून घ्यावे लागायचे. मात्र नंतर ते ऑनलाईन करण्यात आले. पहिल्या वर्षी २०२१-२२ मध्ये ११०४, २०२२-२३- ७६२, २०२३-२४-३८० तर २०२४-२५ मध्ये १२० असे एकूण २३६६ परवाने देण्यात आले. २०११ च्या जनणगनेनुसार जिल्ह्यांची लोकसंख्या २७,०१,२८२ आहे. याच्या १०% लोकांनीही परवाने घेतलेले नाहीत.