संभाजीनगर मनपाकडून महास्वच्छता अभियान

-महाविद्यालय, खाजगी आस्थापना व सामाजिक संस्थांचा मोठा सहभाग

0

संभाजीनगर मनपाकडून महास्वच्छता अभियान

-महाविद्यालय, खाजगी आस्थापना व सामाजिक संस्थांचा मोठा सहभाग

छत्रपती संभाजीनगर : महानगरपालिका यांनी शहरातील स्वच्छतेसाठी ऑगस्ट १ ते १५ महास्वच्छता अभियान एक तास शहरासाठी हे हाती घेतले आहे. यामध्ये त्यांनी नागरिकांसोबत हात मिळवणी करुन शहर स्वच्छ करण्यासाठी व चांगल्या सवयी लागण्यासाठी शनिवारी ०३ ऑगस्ट २०२४ रोजी मोठ्याप्रमाणे, नागरिकांनी, महाविद्यालय, शाळा, खाजगी आस्थापनांनी आणि सामाजिक संस्थांनी यामध्ये मोठा सहभाग नोंदवला आहे.

महास्वच्छता अभियानात मौलाना आझाद महाविद्यालयातील एन एस एस च्या विद्यार्थ्यांनी महाविद्यालयात व परिसरात स्वच्छता मोहीम राबवली. यावेळी मनपा आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांची प्रमुख उपस्थिती होती. या प्रसंगी शनिवारी घनकचरा व्यवस्थापन विभाग प्रमुख रवींद्र जोगदंड यांनी विद्यार्थ्यांना स्वच्छतेचे महत्त्व सांगितले. यावेळेस प्राचार्य मजहर फारूकी, एन एसएस कार्यक्रम अधिकारी जे.डी. शेख व अन्य उपस्थित होते.

यावेळी एमजीएमच्या क्लोव्हरडेल शाळेतील इयत्ता ६वी, ७वी आणि ८वीच्या २०० विद्यार्थ्यांना वायू प्रदूषण आणि कचरा व्यवस्थापनाविषयी माहिती देऊन जागरुक करण्यात आले. यावेळी सल्लागार डॉ. गीतांजली कौशिक यांनी संभाजीनगर स्वच्छ आणि हरित शहर बनवण्यासाठी विद्यार्थ्यांनी कराव्या लागणाºया वैयक्तिक कृतीविषयी माहिती दिली. यावेळी प्रभारी मुख्याध्यापिका वर्षा पोतदार, सत्र समन्वयक सूरज शिंदे, उदय देशमुख यांच्यासह शिक्षक – रुचिता पडळकर, अश्विनी दवणे आणि प्रणिता मोरे या कार्यक्रमात सहभागी झाले.

केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अर्चना बनकर यांनी किड्स वंडर पैलेस इंग्रजी शाळेत वायू प्रदूषण बाबत माहिती दिली. त्या आयोजित केलेल्या चर्चा सत्र बोलत होत्या. यावेळेस हॉटेल मालक संघटनाकडून शनिवारी संभाजीनगर जिमखाना क्लब येथे स्वच्छता मोहिम राबवण्यात आली. यामध्ये औरंगाबाद जिमखाना क्लब व आजू बाजूचा परिसर स्वच्छ करण्यात आला.

साईबाबा मैदान स्वच्छ करून मोहीम यशस्वी

सहाय्यक आयुक्त अर्जुन गिराम यांच्या मार्गदर्शनाखाली झोन क्रमांक ६ अंतर्गत वॉर्ड क्रमांक ८४ ज्ञानेश्वर कॉलनी कासलीवाल सोसायटी मधील साईबाबा मैदान स्वच्छ करून मोहीम यशस्वी पने राबविण्यात आली. यावेळी मनपाचे कर्मचारी, कासलीवाल सोसायटी मधील सदस्य हे मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रतिज्ञा शपथ घेऊन सुरुवात

मनपा कर्मचाºयांनी मराठा विद्यार्थी वसतिगृह कोतवालपुरा येथे असलेला कचºयाच्या ढीगाचे निर्मूलन केले. यावेळी महास्वच्छता अभियान श्रमदान चमन शहागंज परिसर सकाळी ९:३० वाजता प्रतिज्ञा शपथ घेऊन सुरुवात करण्यात आली याप्रसंगी वेल्फेअर असोसिएशन संस्थेचे सचिव जयेश शिंदे उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.