माजलगावचे धरण मृत साठ्यातच
– धरणाच्या पाणलोटक्षेत्रात पुरेसा पाऊस न झाल्यास पाण्याचे संकट अटळ
माजलगाव : प्रतिनिधी
गतवर्षी पुरेसा पाऊस न झाल्याने माजलगावचे धरण भरले नव्हते. यावही वर्षीही तिच परिस्थिती निर्माण झालेली असून यंदा पावसाळा सुरु होऊन दोन महिने लोटले तरी हे धरण मृत साठ्याच्यावर न आल्याने येणाºया काळात भीषण टंचाई येण्याची शकयता आहे. यासोबतच यावर्षी देखील पाण्याअभावी शहर व तालुक्यातील जनतेला दुष्काळ यातना सहन कराव्या लागणार असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. या धरणाच्या पाणलोटक्षेत्रात पुरेसा पाऊस न झाल्यास पाण्याचे संकट अटळ असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
पैठण येथील जायकवाडी धरणाचा दुसरा टप्पा म्हणुन माजलगाव धरणाची ओळख आहे. सिंधफना नदीवरील या धरणातील पाण्यावर माजलगाव शहर, बीड शहर त्याच प्रमाणे या धरणामुळे पुनर्वसीत झालेल्या ११ गावचा पाणी पुरवठा अवलंबून आहे. त्याच बरोबर बीड, परभणी,नांदेड या जिल्ह्यातील ९४ हजार हेक्टर शेतीच्या सिंचनासाठी शेतकºयांची मदारही याच धरणावर आहे. माजलगाव शहरातील बाजारपेठेला धरणाचा मोठा आधार आहे.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी घरकुल योजनेचा अध्यादेश जारी
नामांतरप्रकरणी हस्तक्षेप करण्यास सर्वोच्च नकार
अभिव्यक्ती आयोजित कार्यक्रम
माजलगाव धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील नदी,नाले अद्यापही खळखळले नसल्याने धरणात पाणी येत नसल्याची स्थिती आहे. यामुळे ४३१.८० लक्ष दलघमी असून सध्या केवळ ४२५.१४ येवढेच पाणी आहे. मागच्यावर्षीप्रमाणे याही वर्षी माजलगाव धरण भरेल की नाही असा प्रश्न पाण्यासाठी भटकंती करावी लागलेल्या नागरीकांना पडला आहे. दोन महिन्यात धरणात पाणी न आल्याने उर्वरीत दोन ते अडीच महिन्याच्या पावसाळ्यात धरण भरावे अशी अपेक्षा आहे.
काम झालेले असतांना योजना रखडली
उपसा सिंचन योजना रखडलेलीच गोदावरी नदीचे वाहुन जाणारे पाणी माजलगाव धरणात आणण्यासाठीची असलेले उपसा सिंचन योजना मात्र रखडलेलीच आहे. यावर्षी या योजनेचे काम होणे अपेक्षित होते परंतु अत्यल्प राहिलेल्या भुसंपादनामुळे मात्र या योजनेचे ९५ टक्के काम पुर्ण झालेले असतांना योजना रखडली आहे. गोदावरीतुन वाहुन जाणारे पाणी माजलगाव धरणात आल्यास निश्चीतच या पाण्याचा माजलगाव धरण भरण्यास फायदा होणार आहे. त्याचप्रमाणे टंचाईचाही प्रश्न मिटणार आहे.