निवडणूका पुढे गेल्याने मनोज जरांगे पाटील यांची 29 ऑगस्टची बैठक रद्द

-डाव खेळायला मोठा वेळ : मनोज जरांगे

0

निवडणूका पुढे गेल्याने मनोज जरांगे पाटील यांची 29 ऑगस्टची बैठक रद्द

-डाव खेळायला मोठा वेळ : मनोज जरांगे

जालना : मराठा समाजाला कुणबी प्रमाणत्र द्या अशी मागणी करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांनी आरक्षण दिल नाही तर आगामी विधानसभा निवडणूक लढण्यासंदर्भात २९ ऑगस्ट रोजी आपली भूमिका स्पष्ट करू असे सांगितले होते. मात्र विधानसभेच्या निवडणूका पुढे ढकलल्या गेल्याने ही बैठक पुढे ढकलण्यात आली असल्याची माहिती मनोज जरांगे पाटील यांनी दिली आहे. आता दीड ते दोन महिन्यांनी लढायचे की काय? या संदर्भात निर्णय घेणार असल्याचे मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले आहे.

निवडणूका पुढे गेल्याने मनोज जरांगे पाटील यांची 29 ऑगस्टची बैठक रद्द: महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुका या दिवाळीनंतर होतील, अशी शक्यता वर्तवली जात होती. मात्र आता निवडणुका डिसेंबर पर्यंत पुढे ढकलण्यात आल्या आहेत. या काळात राज्यात राष्ट्रपती राजवट लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकांसाठी चार महिने बाकी आहे. त्यामुळे आता डाव खेळायला मोठा वेळ आहे. निवडणुका लांबल्यामुळे आपल्याला २९ ऑगस्टची बैठक देखील लांबवली असल्याचे मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले. निवडणूक लांब आहे, त्यामुळे आमचे डावपेच सरकारला कळू द्यायचे नाही. त्यामुळे निवडणुकीची तारीख जाहीर होईल, त्यावेळेस बैठक घेणार असल्याचेही जरांगे पाटील म्हणाले.

निवडणूका पुढे गेल्याने मनोज जरांगे पाटील यांची 29 ऑगस्टची बैठक रद्द: मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी विधानसभा निवडणूक लढण्यासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांना तयारीला लागा, कागदपत्रे तयार ठेवा, अशा सूचना केल्या होत्या. या संदर्भातला अंतिम निर्णय २९ ऑगस्टला घेतला जाईल, असे देखील त्यांनी सांगितले होते. त्यामुळे आंतरावाली सराटीत इच्छुकांची मोठी गर्दी दिसून येत होती. मात्र आता निवडणुका पुढे ढकलल्या गेल्या आहेत. मात्र तोपर्यंत सर्व इच्छुकांच्या अर्जाची छाननी करून ठेवणार असल्याचे मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले आहे.

२४ ऑगस्ट पर्यंत अर्ज घेऊन या

आगामी विधानसभा निवडणूक लढण्यासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांनी आपल्या मतदार संघाचा आढावा घेऊन आंतरवाली येण्याच्या सूचना केल्या होत्या. त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी गर्दी करीत आपले परिचय पत्र जरांगे पाटीय यांच्याकडे सुपूर्द केले. यावेळी ते म्हणाले की, सर्व इच्छुकांनी २४ ऑगस्ट पर्यंत आपले अर्ज घेऊन यावेत.

Leave A Reply

Your email address will not be published.