आयुष्य कसं जगावं, कुणासाठी जगावं हे शिकवणारे एक दीपस्तंभ : मनोज जरांगे पाटील
मनोज जरांगे पाटील या लढाऊ वृत्तीच्या व्यक्तीने मराठा समाजाच नव्हे इथल्या प्रत्येक व्यक्तीच्या मनात घर केलं आहे. मनोज जरांगे अनेकांना आपलसं वाकणार नेतृत्व सरकार आणि विरोधकांनी संपविण्याचा प्रयत्न केला त्यात काही राज्याच्या राजकारणात सफसेल फेल ठरत जणू संपण्याच्या मार्गावर असलेले काही समाजद्रोही राजकीय पक्षांनीही घाट बांधले आहेत मात्र ते त्यात सफसेल फेल ठरताना दिसत आहेत. त्यात सध्या फेसबुकवर एक पोस्ट खुप मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ती खालीलप्रमाणे आहे.
उस्मानपुरा चौकात सुनावणी होण्याआधीच झाडाची कत्तल
मंत्री ठाकुर यांच्या प्रतिमेला जोडे मारून निषेध
आज 5th च्या क्लासवर नवोदयचा सराव पेपर चालू असताना एका विध्यार्थ्यांच्या कंपास बॉक्स मध्ये पाटलांचा फोटो एकदम व्यवस्थितरीत्या कट करून चिकटवलेला दिसला..
त्याला विचारलं “कोण हायत र हे..”
तो पेपर बाजूला डेस्कवर ठेवून उभा राहून म्हणाला कि “सर हे जरांगे पाटील हायत आरक्षण मागात्यात मराठ्यांना..” मी त्याला विचारलं “भेटलं कि नाही अजून..” तो बोलला “भेटलं नाही सर पण द्यावाच लागेल बगा त्यानला..”
खूप भारी वाटलं त्याच्या त्या चिमुकल्या चेहऱ्यावरचे ते हावभाव पाहून.
आता जरांगे पाटील हे केवळ एक व्यक्ती राहिलेली नसून आयुष्य कसं जगावं, कुणासाठी जगावं हे शिकवणारे एक दीपस्तंभ तयार झालेलं आहे..
एक छोटा दिवा घेऊन जरी ठामपणे समाजात उभा राहिला तरी खूप मोठे परिवर्तन घडू शकते हा सकारात्मक विचार मनामनावर ठसवणार व्यक्तीमत्व म्हणजे जरांगे पाटील..
समोर येणाऱ्या अनंत अडचणींवर मात करून एक चांगलं व्यक्तिमत्व म्हणून कसं समोर यायचं हे शिकवणारं पुस्तक म्हणजे जरांगे पाटील..
लहानमोठ्यासंगे प्रत्येकजण तूझ्याच भक्तीत लीन होतोय..
हे संघर्षयोध्या तुझ्या समर्पनाचे गीत आम्ही गातोय..
चिंचपुर (ढगे) ता.भूम.