मोदींना मराठा द्वेषाची डनगाळी

मराठा धनगर आरक्षणाला मोदींच्या अप्रत्यक्ष विरोधामुळे जिल्ह्यात भाजपविरोधी लाट

0

मोदींना मराठा द्वेषाची डनगाळी


मराठा धनगर आरक्षणाला मोदींच्या अप्रत्यक्ष विरोधामुळे जिल्ह्यात भाजपविरोधी लाट

अंबाजोगाई : मी जिवंत असेपर्यंत दलित, आदिवासी, ओबीसी आणि वंचितांचे आरक्षण कोणालाही हिसकावून घेऊ देणार नाही, असे पंतप्रधान मोदी म्हणाले. मात्र त्यांच्या या वक्तव्याने मराठा समाजाचा ओबीसी आरक्षणात समावेश तर धनगर समाजाचा एसटी प्रवर्गात समावेश व्हावी या मागणीसाठी राज्यातील समाज आक्रमक असताना मोदींनी असे वक्तव्य करणे म्हणजे नरेंद्र मोदींना मराठा आणि धनगर आरक्षण द्वेषाची डनगाळी लागल्याच्या प्रतिक्रीया मराठा समाजातून उमटताना दिसत आहेत. या वक्तव्याचा धनगर समाजाकडूनही दबक्या आवाजात केला जात आहे. त्यामुळे पंकजा मुंडे यांच्या प्रचारार्थ घेण्यात आलेल्या मोदींच्या सभेने त्याचा फायदा होण्याऐवजी तोटाच झाल्याचे दिसत आहे.

मेंदू खाणाऱ्या अमिबामुळे कोझिकोडमध्ये मुलाचा मृत्यू
मराठा समाजाला आरक्षण बाबत सरकार सकारात्मक

बीड लोकसभेसाठी भाजपच्या उमेदवार पंकजा मुंडे यांच्या प्रचारार्थ अंबाजोगाई येथील कृषी महाविद्यालयाच्या मैदानावर आयोजित केलेल्या विजय संकल्प सभेत ते बोलत होते. यावेळी ते म्हणाले, आरक्षण देताना बाबासाहेबांनी भारतात धर्माच्या आधारे आरक्षण देता येणार नाही. मात्र काँग्रेसने दलित, आदिवासी, वंचितांचे आरक्षण हिसकावून ते धर्माच्या नावावर देण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.

कर्नाटक काँग्रेसने एका रात्रीतून ओबीसी आरक्षणात मुस्लिमांना सहभागी करून घेतले आहे. परिणामी तेथील ओबीसींचे हक्काचे आरक्षण अडचणीत आले आहे. मात्र, मोदी असेपर्यंत दलित, आदिवासी, ओबीसी आणि वंचितांचे आरक्षण कोणालाही हिसकावून घेऊ देणार नाही, असे सांगत त्यांनी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांचा उल्लेख शहजादे असा केला.

महसूल कर्मचाऱ्यांच्या बंदमुळे नागरिकांचा खोळंबा
चिकलठाण्यात गांजा विक्री करणाऱ्यांना अटक

संतापाचे मुख्य कारण काय ?


पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्या भाषणाच्या सुरुवातीलाच मराठीतून संवाद साधत मोदींनी परळी वैद्यनाथ, योगेश्वरी देवी, संत भगवान बाबा, संत नारायण महाराजांना नमन करीत असल्याचे सांगितले. मात्र त्यांनी या सभेतून मराठा व धनगर समाजाचे नाव न घेता त्यांच्या आरक्षणाच्या मागणिता विरोध केल्याने व्यासपीठावर उपस्थित असलेल्या मराठा व धनगर नेत्यांविरोधात जिल्ह्यातून संताप व्यक्त केला जात असल्याचे दिसत आहे.

विरोधी पक्ष नेते विजय वड्डेटीवार यांनी हेमंत करकरेंच्या शरिरात निघालेली बंदुकीची गोळी ही कसाबच्या बंदुकीतील नसल्याचा दावा केला होता. याला विरोध करताना मोदी म्हणाले, काँग्रेसचे नेते मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लीन चिट देत आहेत. ते हुतात्म्यांचा अपमान करीत आहेत. मात्र देशवासीय तो हल्ला कधीही विसरणार नाहीत. इंडिया आघाडीवाले त्यांच्या काळातील जुने दिवस पुन्हा आणू पाहत आहेत; पण मोदी पर्वताप्रमाणे उभा असल्याचा बडेजाव पणा मारत त्यांनी मुश्रिफ यांच्या करकरेंना का व कोणी मारले? या पुस्तकावर बोलणे टाळले.

Leave A Reply

Your email address will not be published.