आजचा मराठा हा मुळचा कुणबी; कुणबी आणि मराठा वेगळे नाहीत – डाॅ. श्रीमंत कोकाटे
इतिहास अभ्यासक डाॅ श्रीमंत कोकाटे यांचे मत
आजचा मराठा हा मुळचा कुणबी; कुणबी आणि मराठा वेगळे नाहीत: डाॅ. श्रीमंत कोकाटे
– इतिहास अभ्यासक डाॅ. श्रीमंत कोकाटे यांचे मत
मिरज : मराठ्यांना ओबीसीतून मिळणारे आरक्षण टिकेल. आजचा मराठा हा मुळचा कुणबी आहे. कुणबी आणि मराठा वेगळे नाहीत, असे थोर इतिहास तज्ञ प्रा.डाॅ. श्रीमंत कोकाटे म्हणाले. यावेळी त्यांनी महाराष्ट्रात मराठा समाजाचे वीस खासदार पात्रता नसतानाही मनोज जरांगे पाटील यांच्यामुळे निवडून ते आले. परंतु त्यातील एकानेही लोकसभेत मराठा आरक्षणाची मागणी केली नसल्याची खंत व्यक्त केली.
तालुक्यातील आरग येथे आयोजित केलेल्या मराठा समाजाच्या प्रबोधन मेळाव्यात बोलत होते. यावेळी व्यासपीठावर माजी मंत्री अजितराव घोरपडे, मराठा सेवा संघाचे जिल्हा सचिव अमृत सूर्यवंशी उपस्थित होते.
मुळ दिव्यांगांना डावलून बोगस प्रमाणपत्र मिळवणाऱ्यांवर गुन्हे दाखल करा
बीडच्या अविनाश साबळेची फायनलमध्ये एंट्री – 3000 मीटर स्टीपलचेस
आरक्षणातून क्रीमी लेयर वगळण्याच्या निर्णयावर चर्चा करण्यासाठी काँग्रेसची बैठक
मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मराठा
जनजागृती व भव्य शांतता रॅली सांगली येथे गुरुवारी ८ रोजी होणार आहे. त्या अनुषंगाने डाॅ. श्रीमंत कोकाटे यांचा प्रबोधनकार मेळावा झाला. यावेळी डाॅ. श्रीमंत कोकाटे म्हणाले, महाराष्ट्रात ११० मुलांनी आत्महत्या केल्या. राजकारण बाजूला ठेवून महायुती आणि महविकास आघाडी सरकारने मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी प्रयत्न करावेत. जे संविधानिक आरक्षण आहे. सामाजिक, शैक्षणिक दृष्ट्या जे मागास आहे. त्यांना आरक्षणाचा लाभ मिळाला पाहिजे अशी मनोज जरांगे पाटलांची भूमिका आहे. यानंतर अजितराव घोरपडे म्हणाले की, आरक्षण मिळेपर्यंत ताठ मानेने लढा. आपल्या मताचा वापर योग्य करा. जो आरक्षण देईल त्याच्या पाठीशी समाजाने उभा राहण्याचे करीत आवाहन करीत सरकारला आरक्षण द्यावेच लागेल, असा इशारा दिला. या कार्यक्रमाला मिरज पूर्व भागातील सकल मराठा समाज मोठ्या संख्येने उपस्थित होता.