जुनी पेन्शन लागू करण्याच्या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

-मुंडण केलेल्या २१ जणांचा मोर्चात सहभाग

0

जुनी पेन्शन लागू करण्याच्या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा


-मुंडण केलेल्या २१ जणांचा मोर्चात सहभाग

बीड : कर्मचाºयांना जुनी पेन्शन योजना लागू करावी, या मागणीसाठी १७ आॅगस्ट रोजी महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेच्या नेतृत्वाखाली शहरातील सिध्दी विनायक कॉम्प्लेक्स येथून ३.४५ वाजता सुभाष रोड-जालना रोड- छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते जिल्हाधिकारी कार्यालय असा २ किलो मीटर एक हजार कर्मचारी हातात विविध फलक घेऊन तर २१ जण मुंडण करून मोर्चात सहभागी झाले होते. यानंतर हा मोर्चा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहोचल्यानंतर घोषणाबाजी करण्यात आली.

२००५ नंतर सेवेत रुजू झालेल्या कर्मचाºयांना महाराष्ट्र नागरी सेवा नियम १९८२ व महाराष्ट्र नागरी सेवा नियम १९८४, भविष्य निर्वाह निधीसह सरसकट जुनी पेन्शन योजना लागू करावी या मागणीसाठी जिल्हाध्यक्ष विष्णू आडे यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला. यावेळी २१ जणांनी मुंडन करून या मोर्चात सहभाग नोंदवला. यावेळी संजय सोनार, मोहन सोनटक्के यांच्यासह कर्मचारी सहभागी झाले होते.

Leave A Reply

Your email address will not be published.