माजी खा. इम्तियाज जलील यांच्या तीन नेत्यांच्या भेटी
– राज्याच्या राजकारणात नव्या चर्चेला उधाण
छत्रपती संभाजीनगर : लोकसभा मतदार संघाचे माजी खासदार तथा एमआयएम प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांच्या घरी राज्यातील ३ नेत्यांनी भेटी दिल्याने नव्या चर्चांना उधाण आले आहे. या ३ नेत्यामध्ये शिवसेनेचे नेते तथा मंत्री अब्दुल सत्तार, राजू शेट्टी, बाबाजानी दुरार्णी यांचा समावेश आहे. त्यामुळे या भेटीमागे नेमक दडलय काय हे जरी समोर आले नसले तरी येणाºया काळात मात्र हे लपून राहणार नसल्याचेही बोलले जात आहे.
आजपर्यंत अब्दुल सत्तार यांनी इम्तियाज जलील यांची भेट घेणे टाळले होते. मात्र जिल्ह्याचे पालकमंत्री होताच त्यांनी माजी खासदार जलील यांच्या घरी जात चर्चा केली. तर घरातून बाहेर पडत गाडीत बसतांना अब्दुल सत्तार यांनी इम्तियाज जलील व त्यांचा मुलगा बिलाल याच्याकडे पाहत व्रजमुठ आवळल्याने काही नवे राजकीय समीकरण दिसणार का असा सवाल राजकीय वतुर्ळात उपस्थित होत आहे.
घरकुलासाठी ५ ब्रास वाळू देण्याच्या योजनेचा एकच लाभार्थी
जायकवाडी धरणात साडेतीन टक्क्यांहून अधिक वाढ
परिवर्तन आघाडीच्या नेतृत्वात २८८ उमेदवार देणार
जायकवाडीतील प्रस्तावित सौरऊर्जा प्रकल्पाची वैधता
अजित पवार गटातून शरद पवारांकडे आलेले बाबाजानी दुरार्णी यांनीही जलील यांची भेट घेतली. तर मंत्री अब्दुल सत्तार आणि इम्तियाज जलील यांच्यातही बंद दाराआड काय चर्चा झाली हे मात्र समजू शकलेले नाही. तर दुसरीकडे राजू शेट्टी यांनी आगामी विधानसभा निवडणुकीत शेतकरी संघटनांची मोट बांधून २८८ जागा लढविण्याचा निर्धार व्यक्त केला, यानंतर त्यांनी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली. याभेटीनंतर त्यांनी जलील यांची भेट घेतली आहे. या भेटीगाठींमुळे आगामी विधानसभा निवडणुकीत राज्याच्या राजकारणात काही राजकीय समीकरणे बदलणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये महायुतीतच पळवापळवी झाल्याचे दिसले. कन्नडचे माजी आमदार नितीन पाटील यांनी राष्ट्रवादीच्या अजित पवार गटात प्रवेश केला. काहीच दिवसांपूर्वी अब्दुल सत्तार यांचे समर्थक माजी आमदार नितीन पाटील यांनी शिवसेनेला रामराम ठोकत अजित दादांच्या पक्षात प्रवेश केला. यामध्ये या नव्या गाठीभेटी कोणते समीकरण उदयास येते याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.