आमदार नारायण कुचे यांच्या भावाने धमकी दिल्याची सुसाइड नोट लिहून एकाची आत्महत्या

-सखोल चौकशी करण्याची आमदार कुचे यांची मागणी

0

आमदार नारायण कुचे यांच्या भावाने धमकी दिल्याची सुसाइड नोट लिहून एकाची आत्महत्या

-सखोल चौकशी करण्याची आमदार कुचे यांची मागणी

बदनापूर : विधानसभेचे आमदार नारायण कुचे व त्यांच्या भावाने धमकी दिल्याची सुसाइड नोट लिहून मिलिंदनगर भागात एका आचाऱ्याने गळफास घेतल्याची घटना आहे. हा प्रकार मंगळवारी दुपारी पावणेतीनच्या सुमारास उघडकीस आला. यामुळे कुचे यांच्या आडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. जगदीश खेमचंद सुरभय्ये (४७, रा मिलिंदनगर) असे या गळफास घेतलेल्या व्यक्तीचे नाव आहे. मात्र मी कधीही त्यांच्या संपर्कात आलेलो नाही. या चिठ्ठीची सखोल चौकशी करावी, अशी मागणी कुचे यांनी केली आहे.

जगदीश हे आचारीचे काम करीत होते. त्यांच्या प्राश्चत त्यांची आई, पत्नी आणि तीन मुली व एक मुलगा आहे. मंगळवारी त्यांनी दुपारी एक सुसाइड नोट लिहून ठेवत गळफास घेतला. हा प्रकार कुटुंबीयांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी तत्काळ त्यांना घाटी रुग्णालयात दाखल केले. या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.

आमदार कुचे व त्यांच्या भावावर गुन्हा नोंदविण्याची मागणी बदनापूरचे माजी आमदार संतोष सांबरे यांनी पोलिस आयुक्तांकडे केली आहे. तर दुसरीकडे उस्मानपुरा पोलिस ठाण्याचे निरीक्षक सोमनाथ जाधव यांनी सांगितले की, सुसाइड नोटच्या अनुषंगाने तपास सुरू आहे. त्यातील हस्ताक्षराची तज्ज्ञांमार्फत खातरजमा करून पुढील कारवाई करू.

आमदार कुचेच्या नावे सुसाइड नोट

मयत जगदीश खेमचंद सुरभय्य यांनी सुसाइड नोटमध्ये मी जगदीश. जय भवानी बँकेकडून दोन लाख कर्ज घेतले होते. मी संपूर्ण व्याज भरले आहे. पण आमदार नारायण कुचे व त्यांचा भाऊ देविदास कुचे मला धमकी देत आहेत म्हणून मी आत्महत्या करीत आहे, अशा आशयाचा मजकूर लिहला आहे.

कधीही त्यांच्या संपर्कात आलो नाही

जगदीश सुरभय्ये यांनी आत्महत्या केल्याची माहिती काल मला पुतण्याने दिली. त्यांच्या चिठ्ठीत माझे नाव आहे. मी कधीही त्यांच्या संपर्कात आलेलो नाही. या चिठ्ठीची सखोल चौकशी करावी, यासाठी मी आयुक्तांची भेट घेतली आहे, असे बदनापूरचे आमदार नारायण कुचे यांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.