मोदी सरकारचा अर्थसंकल्प अधिक निराशाजनक – मायावती
अर्थसंकल्प : मोदी सरकारच्या तिसºया कार्यकाळातील पहिला अर्थसंकल्प आज लोकसभेत सादर करण्यात आला. यावर बहुजन समाज पक्षाच्या (बसपा) प्रमुख मायावती यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मायावती यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट केली आणि म्हटले की, आज संसदेत सादर होणारा केंद्रीय अर्थसंकल्प जुन्याच धर्तीवर जुन्या योजनांवर आधारीत आहे. मूठभर श्रीमंत आणि श्रीमंत वगळता, देशातील गरीब, बेरोजगार, शेतकरी, महिला, यांचे संकटमय जीवन. कष्टकरी, वंचित आणि उपेक्षित बहुजन. त्यांच्यापासून मुक्त होण्यासाठी अच्छे दिन येण्याची आशा कमी आहे, परंतु निराश होण्याची आशा जास्त आहे, असे मायावती म्हणाल्या.
प्रधानमंत्री आवास योजनेबाबत मोठी घोषणा १० लाख कोटी रूपयांची तरतुद
अर्थसंकल्पातून कॅन्सरग्रस्तांना मोठा दिलासा तीन औषधांवरील कस्टम ड्युटी हटवण्याची घोषणा
आरजेडीचे खासदार मनोज झा यांनी केंद्रीय अर्थसंकल्पावर म्हटले आहे की, बिहारला विशेष राज्याचा दर्जा हवा आहे, त्यासाठी सरकार बदलावे लागले तरी तरी चालेल . अर्थसंकल्पात फक्त आंध्र प्रदेश आणि बिहारची नावे घेतल्याने बदल होणार नाही. ग्राउंड रिअॅलिटी रोजगार निर्मितीसाठी बजेटमध्ये काय आहे? असा सवाल त्यांनी केंद्र सरकारला केला आहे.
केंद्रीय अर्थसंकल्पावर काँग्रेस खासदार इम्रान मसूद म्हणाले की, अर्थसंकल्प नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडूं यांना घाबरणारा आहे. त्यांच्याकडे स्वत:चे कोणतेही व्हिजन नाही, अर्थसंकल्पात योजनात तर खूप मांडल्या आहेत, मात्र, त्याची अंमलबजावणी कशी होते ते पाहावे लागेल, असे खासदार मसूद म्हणाले.
अर्थसंकल्पातून कॅन्सरग्रस्तांना मोठा दिलासा तीन औषधांवरील कस्टम ड्युटी हटवण्याची घोषणा
केंद्रीय अर्थसंकल्पात बिहार आणि आंध्र प्रदेशला विशेष योजनांशी जोडले गेले आहे. उत्तर प्रदेशात पाहिल्यास गुंतवणुकीची स्थिती काय आहे? राज्यात सुरू असलेले प्रकल्प कधीच वेळेवर पूर्ण होत नाहीत. उत्तर प्रदेशसारख्या राज्यातील शेतकºयांसाठी पंतप्रधानांनी दिलेल्या अर्थसंकल्पात काही आहे का? असा सवाल माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी उपस्थित केला.
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनीही अर्थसंकल्पाच्या आडून मोदी सरकारवर टीकास्त्र सोडले आहे. राहुल गांधी यांनी सोशल मीडियावर पोस्ट करून म्हटले की, हे खुर्ची वाचवणारे बजेट आहे. यामध्ये इतर राज्यांचे हित जोपासत मित्रपक्षांना खूश करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. या बजेटमुळे सर्वसामान्यांऐवजी उच्चभ्रू वगार्ला दिलासा मिळाला आहे. काँग्रेसचा जुना अर्थसंकल्प आणि सध्याचा जाहीरनामा यातील गोष्टी या अर्थसंकल्पात कॉपी-पेस्ट करण्याचा प्रयत्नत्न करण्यात आला आहे, असा दावाही राहुल गांधींनी केला.