मोदींनी ‘नावडता महाराष्ट्र योजना’ सुरु केली

-बजेटवरून ठाकरेंचा मोदींना टोला

0

मोदींनी ‘नावडता महाराष्ट्र योजना’ सुरु केली

-बजेटवरून ठाकरेंचा मोदींना टोला

मुंबई : अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी बजेट सादर केला. या बजेटमध्ये ओडिशा आणि बिहारसाठी मोठ्या घोषणा करण्यात आल्या आहेत. त्या तुलनेत महाराष्ट्राला काहीच मिळाले नाही, त्यामुळे विरोधकांकडून नाराजीचा सूर ओढण्यात येत आहे. यामध्ये शिवसेना प्रक्षप्रमुख उद्धव ठाकरे म्हणाले की, पंतप्रधान मोदींनी नावडता महाराष्ट्र योजना सुरु केल्याचे दिसत आहे.

मोदी सरकारचा अर्थसंकल्प अधिक निराशाजनक – मायावती
अर्थसंकल्प : लघु-सुक्ष्म उद्योगास दिलासा

यावेळी ठाकरे म्हणाले की, प्रत्येक बजेटमध्ये महाराष्ट्राची निराशाच केली. महाराष्ट्राने आणखी किती अन्याय सहन करायचा? गेल्या दहा वर्षात महाराष्ट्र ओरबडला आणि मुंबईची लूट केली. दिल्लीचे बूट चाटणारे घटनाबाह्य सरकार बसले तोपर्यंत अन्याय सुरुच राहणार आहे, घटनाबाह्य सरकारची किंमत महाराष्ट्रला मोजावी लागत आहे. अश्या शब्दात ताशेरे ओढत पंतप्रधान मोदींनी ‘नावडता महाराष्ट्र’ योजना सुरु केलेली दिसते, असा टोला ठाकरेंनी लगावला.

शरद पवार ओबीसी आणि मराठ्यांमध्ये भांडण लावत आहेत
जात वैधता प्रमाणपत्रासाठी ६ महिने मुदत

याशिवाय काँग्रेस नेत्या यशोमती ठाकुर यांनी प्रतिक्रीया देताना म्हटले की, सर्वसामान्य माणसाला, शेतकºयांना, महाराष्ट्राला काहीही मिळालेलं दिसत नाही आहे. हे पूर्ण पॅकेज आहे. हे जे आताचं बजेट ज्याची घोषणा झालेली आहे. एकंदरीत नितिश कुमारजी आणि चंद्रबाबू नायडूजी यांना स्पेशल ट्रिटमेंट दिल्यासारखी वाटते.

महाराष्ट्राकडे, विदर्भाकडे पूर्णपणे दुर्लक्ष आहे. इथं शेतकºयांच्या एवढ्या मोठ्या प्रमाणात आत्महत्या होत आहेत. यांच्यासाठी काही दिसत नाही आहे. हे जे बजेट आहे ते फक्त महाराष्ट्राच्या तोंडाला चुना लावलेला आहे. महाराष्ट्राला पूर्णपणे रिकामं ठेवलेलं आहे, असा टोला लगावला.

अर्थसंकल्प : 7.75 लाख रुपयांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त
अब्दुल सत्तार-जो पक्षसाठी काम करेल त्याला न्याय मिळेल

महाराष्ट्र, सरकार वाचवेन म्हणे नमो नमो

राष्ट्रवादी शरद पवार गटाचे खा. अमोल कोल्हे यांनी, घालीन लोटांगण वंदीन बिहार, डोळ्यांनी पाहीन आंध्र माझे, दुर्लक्षून राष्ट्र उपेक्षून महाराष्ट्र, सरकार वाचवेन म्हणे नमो नमो अशा शब्दात केंद्र सरकारच्या बजेटवर टीका केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.