अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू काय म्हणाले मोदी?

२०२४ चा अर्थसंकल्प जनसामान्यांची कंबर मोडेल कि मजबूत करेल?

0

अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू काय म्हणाले मोदी?

अर्थसंकल्पात काय घोषणा होणार हे पाहणं महत्त्वाचं असणार

नवी दिल्लीःसंसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सोमवार दि.22 जुलै पासून सुरु झाले असून या अधिवेशनात उद्या बजेट पार पडणार आहे. या अर्थसंकल्पात काय घोषणा होणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. आधी पंतप्रधान नरेंद्र मोदी माध्यमांशी संवाद साधताना म्हणाले की, विरोधकांनी आता त्यांचा पराभव मान्य करावा आणि लोकहितासाठी सरकारला साथ देऊन कामं करावीत.
श्रावणी सोमवार सुरू झाले असल्याने यावेळी त्यांनी देशवासीयांना शुभेच्छा दिल्या. हे बजेट अमृतकाळातलं महत्त्वाचं बजेट आहे. आम्हाला पाच वर्षांचा कार्यकाळ मिळाला आहे, त्याची दिशा करणारं बजेट असेल. 2047 ला जो भारत आहे त्याचा पाया घालणारं हे बजेट असणार आहे, असे मोदी म्हणाले.

संसदेचं पावसाळी अधिवेशन सुरु होत आहे. देश बारकाईने हे पाहतो आहे की अधिवेशन सकारात्मक पद्धतीने कसं पार पडेल. देशाच्या जनतेचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी पाया घालणारं हे अधिवेशन असेल. भारताच्या लोकशाहीच्या गौरवयात्रेत एक महत्त्वाचा टप्पा म्हणजे अधिवेशन आहे. मला, माझ्या सगळ्या सहकार्यांसाठी हा विषय अभिमानाचा आहे. कारण 60 वर्षांनी एक सरकार तिसर्यांदा परतलं आहे. तिसर्या वेळचं पहिला अर्थसंकल्प आम्ही मांडत आहोत. भारताच्या लोकशाहीच्या गौरवयात्रेचं हे रुप आहे. हे अर्थसंकल्पीय अधिवेशन आहे, मी देशाच्या जनतेला जी गॅरंटी दिली आहे त्या सगळ्या आश्वासनांना पूर्ण करण्याच्या दृष्टीने आम्ही पुढे जात आहोत.
आज भारतात पॉझिटिव्ह आऊटलूक, गुंतवणूक, परफॉर्मन्स हे सगळं एका उच्च आलेखावर आहे. भारताच्या विकासयत्रेचा हा महत्त्वाचा टप्पा आहे. माझं सगळ्या पक्षांच्या खासदारांना आवाहन आहे की जानेवारीपासून आम्ही जेवढं सामर्थ्य होतं तेवढी लढाई आपण लढली. जनतेला जे सांगायचं आहे ते सांगितलं. कोणी मार्ग दाखवला कुणी दिशाभूल केली. आता तो काळ संपला आहे.
जानेवारी 2029 मध्ये पुन्हा निवडणूक येईल तेव्हाचे सहा महिने काय करायचं आहे ते करा, पुन्हा मैदानात जा, तोपर्यंत फक्त देशाच्या गरिबांचा, तरुणांचा विचार करा. जनतेचा आवाज व्हा. 2047 मधल्या भारतासाठी आपण कटिबद्ध होऊ, असे नरेंद्र म्हणाले.

आपल्याला देशासाठी लढायचं
निवडून आलेल्या खासदारांचं कर्तव्य आणि जबाबदारी ही आहे की आता लढाई संपली असून येत्या पाच वर्षांत आपल्याला देशासाठी लढायचं आहे, एक आणि नेक बनून लढायचं आहे. पक्षापुरता मर्यादित विचार न करता देशाचा विचार करुन सगळ्यांनी एक व्हावं असे आवाहन मोदींनी केले.

Leave A Reply

Your email address will not be published.