MPSC Prelims Exams Postponed महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या 25 ऑगस्टच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या

नवीन तारीख लवकरच देण्यात येईल

0

MPSC Prelims Exams Postponed महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या – महाराष्ट्र सरकार

नवीन तारीख लवकरच देण्यात येईल

MPSC Prelims Exams Postponed: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षा आणि आयबीपीएस लिपिक पदाच्या परीक्षा एकाच दिवशी आल्याने दोन्ही परीक्षा देणाऱ्या परीक्षर्थिनी विरोध केल्यामुळे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या प्रीलिम परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतला आहे. सदर परीक्षा 25 ऑगस्ट रोजी नियोजित होती. या परीक्षा ओव्हरलॅप झाल्यामुळे अनेक उमेदवारांना या दोन परीक्षांमधून निवड करण्यास आवघड होते. म्हणून उमेदवारांमध्ये मोठ्या प्रमाणात विरोध करण्यात आला.

वाद कसा निर्माण झाला?

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने 25 ऑगस्ट रोजी प्राथमिक परीक्षेची घोषणा केली, आणि त्याच दिवशी IBPS लिपिक पदाच्या परीक्षा नियोजित होत्या. परिणामी अनेक विद्यार्थी या दोन्ही परीक्षांना बसण्यास इच्छुक असूनही बसू शकत न्हवते. मंगळवारी रात्री पुण्यात सुरू झालेल्या या मुद्द्यावरून निदर्शने झाली आणि राजकीय नेत्यांनी पाठिंबा दिल्याने त्याला वेग आला.

MPSC Prelims Exams Postponed: महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी एमपीएससी अध्यक्षांना विद्यार्थ्यांच्या समस्यांचा विचार करण्याचे आवाहन करून हस्तक्षेप केला. तसेच तारखा न बदलल्यास महाराष्ट्र सरकार विरोधात तीव्र आंदोलन करण्याच्या सूचना शरद पवार यांनी दिल्या होत्या. वाढत्या दबावामुळे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने गुरुवारी बैठक घेऊन राज्य सेवा परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला.

परीक्षेची नवीन तारीख अद्याप निशित करण्यात आलेली नसून ती योग्य वेळी जाहीर केली जाईल असे आयोगाने स्पष्ट केले आहे. IBPS परीक्षेची तारीख अनेक महिन्यांपासून निश्चित करण्यात आली होती, तर MPSCने परीक्षेच्या तारखेत वारंवार फेरफार केल्याने उमेदवारांमध्ये संभ्रम निर्माण झाले होते. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षाची तारीख बदलण्यासोबतच उमेदवार आंदोलकांनी कृषी विभागातील 258 पदांसाठी निवड प्रक्रिया राबविण्याचीही हाक दिली आहे.

कृषी विभागातील 258 पदांसाठी निवड प्रक्रियावर पुन्हा विचार करण्यात येईल असे आयोगाने स्पष्ट केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.