गुन्हेगारी प्रवृत्तीला सीसीटीव्हीमुळे आळा बसेल मुंडे यांचे प्रतिपादन
गुन्हेगार तसेच हिंसक प्रवृत्तीवर सीसीटीव्ही कॅमेऱ्यामुळे वचक बसणार
गुन्हेगारी प्रवृत्तीला सीसीटीव्हीमुळे आळा बसेल मुंडे यांचे प्रतिपादन
– गुन्हेगार तसेच हिंसक प्रवृत्तीवर सीसीटीव्ही कॅमेऱ्यामुळे वचक बसणार
बीड : जिल्ह्यातील गुन्हेगारी प्रवृत्तीला सीसीटीव्ही कॅमेऱ्यामुळे आळा बसेल, असे प्रतिपादन राज्याचे कृषिमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी केले. बीड येथे झालेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या उद्घाटन कार्यक्रमात ते बोलत होते.
जिल्ह्यातील पोलिस अधीक्षक कार्यालय येथे झालेल्या कार्यक्रमात आ. प्रकाश सोळंके, जिल्हाधिकारी अविनाश पाठक, पोलिस अधीक्षक नंदकुमार ठाकूर, अपर पोलिस अधीक्षक चेतना तिडके, उपविभागीय पोलिस अधिकारी विश्वंभर गोल्डे यांच्यासह अधिकारी या वेळी उपस्थित होते.या वेळी मुंडे म्हणाले की, बीड जिल्ह्यातील गुन्हेगार तसेच हिंसक प्रवृत्तीवर सीसीटीव्ही कॅमेऱ्यामुळे वचक बसेल, ज्या ठिकाणी हे कॅमेरे बसविण्यात आले आहेत त्या ठिकाणी कायदा सुव्यवस्था बिघडणार नाही तसेच त्या आसपासचा परिसरही अशा घटनांपासून सावध राहील.
श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रांत पावसासाठी सहस्रधारा अभिषेक
पर्यावरण जनजागृतीसाठी इको क्लबची स्थापना
अद्ययावत सीसीटीव्ही यंत्रणेमुळे गुन्हे घडण्याचे प्रमाण कमी होईल, तसेच झटपट तपास आणि लवकर निकाल व न्याय ही प्रक्रिया सोपी होईल. पुढील एक महिन्याभराचा अहवाल पोलिस अधीक्षकांनी सीसीटीव्ही कॅमेरा निगराणी करणाऱ्या टीमकडून घेऊन गुन्हेगारीचे प्रमाणात किती घट झाली हे पाहावे, अशा सूचना मंत्री धनंजय मुंडे यांनी दिल्या.
बीड जिल्ह्यातील मुख्य रस्ते राष्ट्रीय महामार्गाला जोडले आहेत यापैकी कोणता भाग हा ब्लॅक स्पॉट म्हणून आहे त्याची तपासणी करून पुढील काळात अशा ठिकाणीही सीसीटीव्ही कॅमेऱ्याची निगराणी असावी, अशी अपेक्षाही त्यांनी जिल्हा प्रशासनाकडून या वेळी व्यक्त केली. सीसीटीव्ही बसवण्याचा हा पहिला टप्पा आहे. आगामी जिल्हा नियोजनमधून उर्वरित तालुक्याची अन्य शहरे कव्हर केली जातील. जिल्हा नियोजन समितीमध्ये सीसीटीव्ही कॅमेरा अद्यावतीकरणासाठी ८० टक्के निधी आणि पोलिस विभागाकडून २० टक्के निधी असा राखीव ठेवण्याचे निर्देश त्यांनी या वेळी जिल्हाधिकारी यांना दिले.
चिकलठाण्यात गांजा विक्री करणाऱ्यांना अटक
अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू काय म्हणाले मोदी?
जिल्ह्यात ४२६ ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे
बीड शहरात एकूण कॅमेऱ्याच्या ठिकाणांची संख्या ४५ असून कॅमेऱ्याची संख्या १७८ अशी आहे. परळी शहरात कॅमेऱ्याचे एकूण ठिकाणे ३५ असून कॅमेऱ्याची संख्या १३३ एवढी आहे. माजलगाव शहरात २६ ठिकाणी ११५ कॅमेरे लावण्यात आले. आष्टी शहरात एकूण २३ ठिकाणी ९० कॅमेरे लावले जाणार आहेत. यामध्ये ४२६ ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार आहेत.
स्मार्ट मीटर बसवणार सरकारी कार्यालयांमध्ये
कॅमेऱ्यासाठी १३ कोटींचा खर्च
बीडमधील १७८ कॅमेºयासाठी ४ कोटी ५० लक्ष रुपये खर्च लागला आहे. परळी येथील ३५ कॅमेऱ्यासाठी ३ कोटी ५० लक्ष रुपये खर्च करण्यात आलेला आहे. माजलगाव शहरात बसवण्यात आलेल्या ११५ कॅमेºयांसाठी ४ कोटी ९४ लाख रुपये यासाठी खर्च झालेला आहे. तसेच आष्टीतील ९० कॅमेºयांसाठी २ कोटी ५० लक्ष रुपये खर्च होणार आहे.