शहर स्वच्छ बनविण्यासाठी माझा कचरा माझी जबाबदारी मोहिम
-हम होंगे कामयाब चा नारा देत क्रांतीचौकात महास्वच्छता अभियान
शहर स्वच्छ बनविण्यासाठी माझा कचरा माझी जबाबदारी मोहिम
-हम होंगे कामयाब चा नारा देत क्रांतीचौकात महास्वच्छता अभियान
छत्रपती संभाजीनगर : शहर स्वच्छ व सुंदर बनविण्यासाठी माझा कचरा माझी जबाबदारी मोहिमेत हम होंगे कामयाब चा नारा देत क्रांतीचौकात महास्वच्छता अभियानास एक तास शहरासाठी महानगरपालिकेच्या या मोहिमेस मान्यवरांच्या उपस्थित प्रारंभ करण्यात आला. यावेळी महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक जी. श्रीकांत, पोलीस उपायुक्त नितीन बगाटे, घनकचरा व्यवस्थापन प्रमुख रवींद्र जोगदंड, लेखाधिकारी संतोष वाहूळे, उपायुक्त रणजित पाटील आदींची उपस्थिती होती.
वंचितच्या प्रकाश आंबेडकरांसाठी भाजप आमदाराने पाटोद्यात वाजविला ढोल!
स्वप्नील कुसळेने मिळवून दिले भारताला तिसरे कांस्य पदक
राजरत्न आंबेडकर यांचा मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा
छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका व स्मार्ट सिटीने देशात स्वच्छतेत पहिल्या क्रमांकावर येण्याचा संकल्प करून एक तास शहरासाठी अशा शहरव्यापी महास्वच्छता अभियान १ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट दरम्यान राबविण्यात येत असून यासाठी समाजातील विविध घटकांनी सहभाग नोंदवण्याची तयारी दर्शवली असून प्रत्येक नागरिकापर्यंत या मोहिमेत सामील करण्याचे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेऊन महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक जी. श्रीकांत यांच्या संकल्पनेतून राबवण्यात येत आहे. यांची सुरुवात क्रांतीचौकातुन करण्यात आली. या महास्वच्छता अभियानात लोकप्रतिनिधी, विविध विभागातील शासकीय व निमशासकीय अधिकारी, नागरिक यांच्यासह शहरातील सर्व शासकीय व निमशासकीय कार्यालय, सर्व महाविद्यालयीन विद्यार्थी, शिक्षक, व्यापारी व हॉटेल संघटना, सेवाभावी संस्था, एनसीसी व एनसेसे यांनी या मोहिमेत सहभाग नोंदवण्यासाठी क्रांतीचौकत मोठी गर्दी केली होती.
या मोहिमेस प्रारंभ करण्यात आल्यानंतर आपल्या भागातील कार्यक्षेत्रातील प्रमुख रस्त्यावरील दुभाजके, त्या लगतची माती, गाजरगवत, झाडे झुडपे काढुन स्वच्छ करणे, आपल्या भागातील कार्यक्षेत्रातील सार्वजनिक इमारतीच्या संरक्षण भिंतीवर भिंतीवर, दुभाजक फुटपाथ या ठिकाणी थुंकलेले भाग धुवुन स्वच्छ करणे. आपल्या भागातील कार्यक्षेत्रातील ऐतिहासिक स्थळांची ऐतिहासिक दरवाजे तसेच महापुरुषांचे पुतळयांची स्वच्छता करणे. मुख्य उद्याने विमानतळ परिसर रेल्वे स्थानक बसस्थानक, रिक्षा स्थानके इत्यादी विशेष स्वच्छता करणे, धार्मिक स्थळांची विशेष स्वच्छता विद्युत रोहित्रीची महावितरण विभागाच्या मदतीने स्वच्छता करण्याची कामे या अभिनयात लोकसभागाच्या माध्यमातून राबवण्यात येणार आहेत.