नॅचरल शुगर (Natural Sugar) कारखाना ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात सुरू होणार

अध्यक्ष बी. बी. ठोंबरे यांची माहिती । नॅचरल शुगर कारखान्याचे थाटात मील रोलर पूजन

0

नॅचरल शुगर कारखाना (Natural Sugar) ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात सुरू होणार

अध्यक्ष बी. बी. ठोंबरे यांची माहिती । नॅचरल शुगर (Natural Sugar) कारखान्याचे थाटात मील रोलर पूजन

कळंब : तालुक्यातील रांजणी येथील नॅचरल शुगर ( Natural Sugar ) कारखान्याच्या गळीत हंगाम २०२४-२५ चे पूर्व तयारी पूर्ण करण्याच्या दृष्टीने मील रोलर पूजन गुरूवारी नॅचरल उद्योग समुहाचे संस्थापक अध्यक्ष बी. बी. ठोंबरे यांचे हस्ते विधीवत पूजा करून करण्यात आले. यावेळी बी. बी. ठोंबरे यांनी कारखाना निर्धारीत वेळेत ऑक्टोबर २०२४ चे पहिल्या आठवड्यात सुरू होणार असून येत्या हंगामामध्ये अपेक्षित ऊस गाळप होणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

यावेळी बोलतांना बी. बी. ठोंबरे यांनी यावर्षी पावसाळयाचे सुरूवातीलाच जून महिन्याचे पहिल्या आठवडयात समाधानकारक पाऊस झालेला असल्याने व कारखान्याकडे मागील ऊस लागवड हंगामातील ऊस नोंद आवश्यतेप्रमाणे झालेली असल्याने गाळप हंगाम २०२४-२५ मध्ये कारखान्याचे गरजे ईतके ऊस उपलब्ध होणार आहे. त्यामुळे येता गळीत हंगाम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी यंत्रसामुग्रीची साफसफाई, दुरूस्ती व देखभालीची कामे युद्ध पातळीवर सुरू आहेत.

कारखाना चांगल्या कार्यक्षमतेने चालणार असल्याने तसेच कार्यक्षेत्रात उपलब्ध असणाºया ऊसाचे जास्तीत जास्त गाळप करण्याचे उद्दीष्ट ठेवण्यात आले आहे. तसेच क्षमतेपेक्षा ऊस क्षेत्र कमी असल्याने शेतकºयांचा ऊस वेळेअगोदर गाळप होणार आहे.

लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून सरकारने डाव टाकला
रोजगार हमी योजनेच्या रक्कमेसाठी ठिय्या आंदोलन
शेतीच्या योजनांसंदर्भात घोटाळ्याचे काय झाले?

रोलर पुजनामुळे कारखान्याच्या सर्व कर्मचाºयांमध्ये एक उर्जा निर्माण होत असते आणि पुढील कामास गती प्राप्त होते. यंत्रसामुग्री दुरूस्तीची कामे अंतिम टप्प्यात आली असून यंत्रसामुग्री उभारणीचे काम हाती घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. याप्रसंगी कारखान्याचे टेक्नीकल डायरेक्टर अनिल ठोंबरे, संचालक, प्रवर्तक, अधिकारी, कर्मचारी बहुसंख्येने उपस्थित होते.

पिकावरील बुरशी प्रादुर्भावामुळे शेतकरी त्रस्त
लाडका भाऊ योजनेसाठीचे फक्त हेच युवक पात्र

Leave A Reply

Your email address will not be published.