Old Pension Scheme (OPS) जुनी पेन्शन योजना मागणीसाठी महाराष्ट्रातील कर्मचाऱ्यांचा मोर्चा

GPS आणि NPS विरोधात पुणे जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा

0

Old Pension Scheme (OPS) जुनी पेन्शन योजना मागणीसाठी महाराष्ट्रातील कर्मचाऱ्यांचा मोर्चा

GPS आणि NPS विरोधात पुणे जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा

केंद्र सरकारने Old Pension Scheme (OPS) जुनी पेन्शन योजना बंद करून Guaranteed Pension Scheme (GPS) आणि New Pension Scheme (NPS) नवीन पेन्शन योजना सुरु केलेली आहे. यामुळे प्रत्येक राज्यातील शासकीय अधिकाऱ्यांनी याचा विरोध केला आणि जुनी पेन्शन योजनाची मागणी केली. यासाठी शिक्षक – शिक्षतेत्तर कर्मचारी, अधिकारी यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली, मात्र मुंबई उच्च न्यायालयाने सरकारच्या बाजूने निकाल दिला. या निकालास राज्यातील शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचार्यांच्या संघटनांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले.

NPS योजनेअंतर्गत सशस्त्र दलांतील कर्मचारी सोडून इतर सर्व शासकीय कर्मचाऱ्यांच्या बेसिक पगारातून 10 टक्के रक्कम प्रती महिना कापून NPS मध्ये जमा केली जाते आणि 14 टक्के रक्कम हि सरकार भरते. आणि यातूनच पुढे कर्मचाऱ्यांना पेन्शन दिलं जातं. खाजगी क्षेत्रातील कर्मचारीही NPS मध्ये भाग घेऊ शकतो,मात्र त्यांच्यासाठी नियम थोडेसे वेगळे आहेत. पण OPS आणि NPS या पेन्शनमध्ये मोठी तफावत असल्याचं कर्मचाऱ्यांना दिसून आलं आणि नव्या योजनेला विरोध होऊ लागला.

महाराष्ट्रातील कर्मचाऱ्यांनी सरकारपुढे सतत आंदोलने करत जुनी पेन्शन लागू करण्यासाठी मोर्चे केले. यावर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी निवृत्त सनदी अधिकाऱ्यांची समिती नेमल्याचे आणि केंद्रसरकारही जुनी पेन्शन योजना लागू करण्यासंदर्भात सकारात्मक आहे असे सांगितले.

तसेच 1 नोव्हेंबर 2005 पूर्वी निघालेल्या जाहिरातीनुसार त्यानंतरच्या कालावधीत महाराष्ट्रातील अनुदानित व निमशासकीय संस्थेमध्ये सेवेत रुजू झालेले शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी यांनाही जुनी पेन्शन योजना लागू करण्याचे निर्णय पुढील ३ महिन्याच्या आत घेण्यात येईल असा शब्द अजित पवार यांनी दिला आहे.

जुनी पेन्शन योजना

यानंतर यात पुढे कांहीही हालचाल दिसून येत नसल्याने महाराष्ट्रातील कर्मचारी अस्वस्थ झालेले असून, “महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना”च्या वतीने आज दिनांक 12 ऑगस्ट 2024 रोजी हजोरोंच्या संख्येने पुणे जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य जुनी पेन्शन योजना मोर्चा काढला.
या मोर्चामध्ये महाराष्ट्रातील कर्मचाऱ्यांचे “एकच मागणी : सरसकट जुनी पेन्शन योजना लागू करा”, “सरकार च्या सुधारित पेन्शन GPS ला विरोध”, “#NoNPS #NoGPS #WeWantOnlyOPS” अशा प्रकारच्या घोषणा होत्या.

Leave A Reply

Your email address will not be published.