काँग्रेसच्या वतीने महाराज माफ करा म्हणत हात जोडत आंदोलन

-सरकारच्या भ्रष्ट कारभारामुळेच पुतळा पडल्याचा आरोप

0

काँग्रेसच्या वतीने महाराज माफ करा म्हणत हात जोडत आंदोलन

-सरकारच्या भ्रष्ट कारभारामुळेच पुतळा पडल्याचा आरोप

छत्रपती संभाजीनगर : मालवण येथील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा पडल्यानंतर राज्यभर निदर्शने केली जात असतानाच काँग्रेस आक्रमक झाली आहे. काँग्रेसच्या वतीने क्रांती चौकमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ महाराज माफ करा, महाराज माफ करा, असे हात जोडत आंदोलन केले. सरकारच्या भ्रष्ट कारभारामुळेच मालवण या ठिकाणी पुतळा पडला असल्याची टीका कॉंग्रेसचे शहाराध्यक्ष ​​​युसुफ शेख यांनी केली आहे.

मालवण मधील शिवाजी महाराजांचा पुतळा पडल्यानंतर राज्यभर त्याचे पडसाद पाहायला मिळत आहेत. यामध्ये संभाजीनगरात काँग्रेसच्या वतीने या प्रकरणात जोरदार निदर्शने करण्यात आली. या आंदोलनात सरकारचे विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी शहर जिल्हा अध्यक्ष युसूफ शेख,माजी अध्यक्ष इब्राहिम पठाण, डॉ जफर खान,भाऊसाहेब जगताप,महिला शहर अध्यक्ष दीपाली मिसाळ,डॉ जितेंद्र देहाडे, योगेश मसलगे, संजय धर्मरक्षक, साहेबराव बनकर, यांचा सहभाग होता.

मिंधे सरकार मुदार्बादच्या घोषणा

पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या काळातले पुतळे अजूनही चांगल्या स्थितीत असताना हा पुतळा मात्र केवळ आठ महिन्यातच कसा पडला. या भ्रष्टाचारी सरकारचा धिक्कार व निषेध असो, मिंधे सरकार मुदार्बाद अश्या घोषणा देण्यात आल्या… अशी घोषणाबाजी करण्यात आली. शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने शहर अध्यक्ष शेख युसूफ यांच्या नेतृत्वात क्रांती चौक येथे आंदोलन करण्यात आले. या आंदोलन नंतर पोलीस आयुक्त यांना देखील निवेदन देण्यात आले.

Leave A Reply

Your email address will not be published.