बदलापूर येथील घटनेचे विरोधकांनी राजकारण करू नये – संजय शिरसाट

-शिवसेना नेते संजय शिरसाट यांचे विरोधी पक्षांना आवाहन

0

बदलापूर येथील घटनेचे विरोधकांनी राजकारण करू नये – संजय शिरसाट

-शिवसेना नेते संजय शिरसाट यांचे विरोधी पक्षांना आवाहन

छत्रपती संभाजीनगर : बदलापूर येथे भाजप नेत्यांच्या एका शाळेत घडलेल्या लैंगिक अत्याचाराच्या घटनेमुळे राज्यात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेने या प्रकरणी सर्वच राजकीय पक्षांना राजकारण न करण्याचे आवाहन केले आहे. बदलापूरची घटना गंभीर आहे, या घटनेचा अनेकांनी निषेध केला. सरकारही या प्रकरणी योग्य ती कारवाई करत आहे. त्यामुळे या प्रकरणी कुणीही राजकारण करू नये, असे आवाहन शिवसेना नेते संजय शिरसाट यांनी केले आहे. यावेळी शिरसाट यांनी खासदार सुप्रिया सुळे अ‍ॅक्टिंग करणाºया नेत्या असल्याची टीका केली.

बदलापूर येथील लैंगिक अत्याचाराच्या घटनेवरून राज्याचे राजकारण चांगलेच पेटले आहे. या घटनेविरोधात नागरिकांनी या विरोधात तीव्र संताप व्यक्त केला. बदलापूर येथील लैंगिक ही घटना गंभीर असल्याने त्याची तीव्रता राज्याला व देशाला जाणवत आहे त्यामुळे अनेकांनी त्या घ​​​​​​​टनेचा निषेध केला. या प्रकरणी सरकारनेही योग्य ती कारवाई केली, अशा घटनांतून आपण बोध घेण्याची गरज आहे. काही पक्षांना यामध्ये संधी दिसून येत पण विरोध करणाºया पक्षांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घ्यावे, असे शिरसाट म्हणाले.

बदलापूर येथे घडलेली ही इतिहासात ही पहिली घटना असेन की एका पक्षाचा नेता दुसºया पक्षाच्या मेळाव्यात जाऊन भाषण करतो. स्वत: उद्धव साहेब म्हणाले त्यांनी काँग्रेसचा पट्टा घातला आहे. त्यामुळे यावर वाद कशाला? काल संजय राऊत यांनी कार्यक्रम संपेपर्यंत गळ्यातला पट्टा काढला नाही. ठाकरे गट आता पूर्ण काँग्रेसमय झाला आहे, असा शब्दात शिरसाट यांनी उद्धव ठाकरे व संजय राऊत यांच्या समाचार घेतला.

राजकारण आणू नये

या घटनेचे पडसाद तिव्र पाहायला मिळत आहेत. मात्र काही लोक यामध्ये संधी शोधण्याचा प्रयत्न करतात. त्यांनी भावनांचे राजकारण करू नये. लाठीचार्ज झाला ही दुदैर्वी गोष्ट आहे. मात्र हे करावे लागले. मात्र राज्यात ९५ टक्के संस्था या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आहेत. त्यामुळे यामध्ये राजकारण आणू नये, असे मत शिरसाट यांनी व्यक्त केले.

सुळे अ‍ॅ​​​​​​​क्टिंग करत आहेत

शिरसाट यांनी सुप्रिया सुळे यांच्यावर टीका करताना म्हणाले की, सुप्रिया सुळे ह्या राजकारणात काम करण्यापेक्षा अ‍ॅ​​​​​​​क्टिंग करत आहेत. त्यांच्या काळात अनेक घटना घडल्या. त्या आम्ही सांगू शकतो. मात्र आम्ही तू-तू मै-मै करणार नाही.

Leave A Reply

Your email address will not be published.