बांगलादेशमधील हिंसाचारामुळे संत्रा उत्पादक शेतकरी अडचणीत

-निर्यात करण्यात येणाऱ्या २.५० लाख टन संत्र्याचे करायचे काय शेतकऱ्यांपुढे नवा प्रश्न

0

बांगलादेशमधील हिंसाचारामुळे संत्रा उत्पादक शेतकरी अडचणीत

-निर्यात करण्यात येणाऱ्या २.५० लाख टन संत्र्याचे करायचे काय शेतकऱ्यांपुढे नवा प्रश्न

नवी दिल्ली : बांगलादेशमध्ये सुरू असलेल्या हिंसाचारामुुळे संत्रा उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला आहे. बांगलादेशमध्ये निर्यात करण्यात येणाºया २.५० लाख टन संत्र्याचे काय करायचे असा प्रश्न संत्रा उत्पादक शेतकऱ्यांपुढे निर्माण झाल्याने ते आडचणीत सापडले आहेत. आंबीया आणि मृग बहार मिळून संत्रा उत्पादन ७ ते ८ लाख टन आहे. यापैकी २.५० लाख टन बांगलादेशला जात होता. आता आयात ट्यूटी वाढवल्याने २५ ते ३० हजार टनावर आली होती.

बांगलादेशमधील हिंसाचारामुळे संत्रा उत्पादक शेतकरी अडचणीत: यापूर्वी पणन व कृषी विभागाने पुणे, मुंबई व नागपुरला संत्रा महोत्सव आयोजित केले होते. तसे ते परत घेण्याची गरज आहे. आंबीया बहाराचा संत्रा सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यापासून निघतो. आंबीया बहार डिसेंबरपर्यत चालतो. मृग बहार १५ जानेवारी ते १० एप्रिल मर्यत चालतो. मृग बहारातील संत्रा चव आणि आकाराला चांगला असतो. मात्र बांगलादेशात होणारी निर्यात घटल्याने आडचणीत सापडलेल्या संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना शासनाने मदत करणे गरजेचे आहे. निर्यात न करताही संत्र्यासाठी देशातंर्गत बाजारपेठ उपलब्ध आहे. सरकारने वाहतुकीचा प्रश्न सोडवल्यास संत्रा उत्पादकांना मोठा दिलासा मिळेल असे महाआॅरेंजचे कार्यकारी संचालक श्रीधर ठाकरे यांनी सांगितले.

बांगलादेशमधील हिंसाचारामुळे संत्रा उत्पादक शेतकरी अडचणीत: केंद्र सरकारच्या शेतमाल निर्यातबंदी धोरणामुळे अडचणीत आलेल्या बांगलादेशने आॅक्टोबर २०१९ मध्ये पहिल्यांदा संत्र्यावर २० टका प्रतिकिलो आयात शुल्क लावले. यात वर्षागणिक वाढ करण्यात आल्याने २०२४ मध्ये हे आयात शुल्क १०१ टका प्रतिकिलो करण्यात आले आहे. बांगलादेशातील सामान्य ग्राहकांना ६० ते ८० टका प्रतिकिलो संत्रा खरेदी करणे आर्थिकदृष्ट्या परवडते. यामध्ये विदर्भातील १ लाख ६० हजार हेक्टरमधील संत्रा बागा उत्पादनक्षम आहेत. या बागांपासून दरवर्षी किमान ७.५० ते ८ लाख टन संत्र्याचे उत्पादन होत असून, यात सरासरी ४.५० ते ५ लाख टन अंबिया आणि २.५० ते ३ लाख टन मृग बहाराच्या संत्र्याचा समावेश आहे. २०१९-२० पर्यंत यातील सरासरी २ ते २.५० लाख टन संत्र्याची निर्यात व्हायची. यातील किमान १.७५ लाख टन संत्रा बांगलादेशात निर्यात व्हायचा.

मार्केटिंग केल्यास दर मिळणे कठीण नाही

नागपुरी संत्र्याला सरासरी ३० ते ३५ हजार रुपये प्रतिटन भाव मिळायला हवा. २०२२ मध्ये काही शेतकºयांना ४८ हजार रुपये प्रतिटन भाव मिळाला होता. मध्यंतरी संत्र्याचे दर ५० ते ६० हजार रुपये प्रतिटनावर गेले होते. संत्र्याचे योग्य मार्केटिंग आणि विक्री नेटवर्क निर्माण केल्यास हा दर मिळणे कठीण नाही, असे महाआॅरेंजचे कार्यकारी संचालक श्रीधर ठाकरे म्हणाले.

Leave A Reply

Your email address will not be published.