मराठा आरक्षणासाठी आमची कारवाई आधीच सुरू
-मंत्री शंभूराज देसाई यांची महाविकास आघाडीवर टीका
जालना : मराठा समाजाला देवेंद्र फडणवीस यांच्या महायुतीच्या सरकारच्या काळातच आरक्षण देण्यात आले. मात्र त्यानंतर महाविकास आघाडीचे सरकार आले आणि त्यांना आरक्षण टिकवता आले नाही. असा आरोप मंत्री शंभूराज देसाई यांनी केली आहे. आता देखील महायुतीचे सरकार आहे. त्यानंतरच मराठा समाजाच्या आरक्षणाचा कायदा झाला. तो कायदा अजूनही टिकलेला आहे. मराठा आंदोलन मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण मागे घेतल्यानंतर शंभूराजे यांनी माध्यमांशी संवाद साधला.
पालकमंत्र्याची नियुक्ती करा विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांची सरकारकडे मागणी
खुशखबर : सोन्याच्या दरात मोठी घसरण
मराठा आरक्षणासाठी आमची कारवाई आधीच सुरू झाली होती. मनोज जरांगे पाटील हे उपोषण मागे घेणार आहेत, याची कोणालाही कल्पना नव्हती. या संदर्भात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यानुसार त्यांच्या प्रत्येक मागणीवर आढावा घेतला असल्याची माहिती देसाई यांनी दिली. या बैठकीत सगेसोयºयांच्या अंमलबजावणी संदर्भात काय कारवाई केली? हैदराबाद गॅजेट संदर्भात कारवाई केली? पोलिसांमधील खटले मागे घेण्यासाठी काय कार्यवाही झाली? शिंदे समितीला मुदतवाढ देण्यासंदर्भात काय कारवाई करण्यात आली? याचा देखील आढावा घेतला. हे सर्व मनोज जरांगे पाटील यांनी अल्टिमेटन देण्याच्या आधीच झाले होते. त्यामुळे राज्य सरकारचे काम हे सुरू असल्याचा दावा देसाई यांनी केला.
शब्दानुसार काम सुरू
मनोज जरांगे पाटील यांना सरकारच्या वतीने देण्यात आलेल्या प्रत्येक आश्वासनावर कार्यवाई सुरू असून कोणताही वेळ वाया न जाता त्यांना दिलेल्या शब्दानुसार काम सुरू असल्याचेही मंत्री देसाई यांनी म्हटले आहे.