जालना-नांदेड प्रस्तावित समृद्धी महामागार्तील शेतकऱ्यांना मोबदला देण्यात यावा

0

शेतकऱ्यांना मोबदला द्या

जालना : जालना-नांदेड या प्रस्तावित समृद्धी महामागार्तील शेतकऱ्यांच्या संपादित जमीनीमधील नोंदी परिशिष्ट १६ नुसार घेवून मुंबई – नागपूर या समृद्धी मागार्साठी संपादित जमिनींचा मोबदला दिला त्याच धर्तीवर या शेतकऱ्यांना मोबदला देण्यात यावा, अशी मागणी आमदार कैलास गोरंटयाल यांनी जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांच्याकडे केली आहे.
जालना – नांदेड या प्रस्तावित असलेल्या समृद्धी महामागार्ची हस्ते पिंपळगाव, कडवंची, पानशेंद्रा, रामनगर येथील शेतकऱ्यांच्या शेत जमीनी संपादित करण्यात आलेल्या आहेत. सदर जमीनीचे पंचनामे करून शेतकऱ्यांच्या जमीनीतील फळबाग, विहिर आदी बाबींची नोंद परिशिष्ट १६ मध्ये घेण्यात आलेली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.