जनतेने लोकसभेत भाजपचे मनसुभे फेटाळून लावले – जयंत पाटील

-राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील

0

जनतेने लोकसभेत भाजपचे मनसुभे फेटाळून लावले

-राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील

बदनापूर : भाजप महायुतीने चारशे पार चा नारा, केवळ संविधान बदलण्यासाठी दिला होता परंतु सामान्य जनतेने लोकसभा निवडणुकीत भाजपचे मनसुभे फेटाळून लावले तसेच आता विधानसभा निवडणुकीत करून दाखवा अन्यथा महायुती आल्यास त्यांचे संविधान बदलण्याचे स्वप्न पूर्ण होईल, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केले.

राष्ट्रवादीच्या वतीने शिवस्वराज यात्रेचे बदनापूर येथे आगमन झाले. यावेळी ते बोलत होते. पाथ्रीकर कॅम्पसमध्ये झालेल्या कार्यक्रमास खासदार अमोल कोल्हे, आमदार राजेश टोपे यांची उपस्थिती होती. खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी आपल्या भाषणाच्या सुरुवातीलाच महायुतीच्या सरकारवर टीका करताना महाराष्ट्राच्या राजकारणाची नासाडी केल्याचे ताशेरे ओढले. संस्कृतीला गालबोट लावण्याचे काम महायुतीतल्या नेत्याकडून होतं आहे.

यशवंतराव चव्हाण यांच्या काळात राजकारणात विचार, संवाद, सुससंस्कृततेला आदराच स्थान होतं, आता विरोधी पक्षातला बोलला की सत्ताधारी आपोआप बोलतात की, सरकार के खिलाफ जादा मत बोल, ईडी सीबीआय लगा देंगे. आज भारतातील निर्यात शुल्क ४० टक्के म्हणजे ६५० डॉलर आणि पाकिस्तानात निर्यात शुल्क ३५० डॉलर आहे. जागतिक पातळीवर १० टक्के निर्यात होते. आपण भरत असलेल्या कराबद्दल जन्माला आल्यापासून जाईपर्यंत १८ टक्के जीएसटी लागतो. मात्र उद्योजकांना करात सूट दिली जाते, असा आरोप अमोल कोल्हे यांनी केला.

दादा नऊ वर्ष कुठं होतात

राज्यातली योजना वाईट नाही त्याच्या हेतू बद्दल वाईट वाटतं. नऊ वर्ष न येणारा भाऊ दहाव्या वर्षी येतो, बहीण विचारणारच ना दादा नऊ वर्ष कुठं होतात, असा सवालही डॉ. कोल्हे यांनी उपस्थित करताच सभत हशा पिकला.

Leave A Reply

Your email address will not be published.