रस्त्याचे काम सुरू असल्याने विद्यार्थ्यांचे हाल

दासखेड येथील मुलांना शाळेत जाण्यासाठी करावी लागतेय करसत

0

रस्त्याचे काम सुरू असल्याने विद्यार्थ्यांचे हाल

– दासखेड येथील मुलांना शाळेत जाण्यासाठी करावी लागतेय करसत

पाटोदा : तालुक्यातील दासखेड येथील आरगडे वस्ती, पवार वस्ती, शिंदे वस्ती, निर्मळ वस्ती, गोरे वस्ती येथील शालेय विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी दासखेड गावातील जिल्हा परिषद आणि रयत शिक्षण संस्थेच्या शाळेत जाण्यासाठी पाठीवर दप्तर आणि हातात चप्पल घेऊन दोन किलोमीटर चिखल तुडवत जावे लागते. एकीकडे शाळेत विद्यार्थ्यांची संख्या वाढवावी, विद्यार्थ्यांना शिक्षणाची गोडी लागावी म्हणून शासन विविध उपक्रम राबवत आहे. मात्र ग्रामीण भागातील रस्त्यांचे काम झाले नसल्याने विद्यार्थ्यांना शाळेत जाताना मोठी कसरत करावी लागत आहे.

हे पण वाचा
पिकावरील बुरशी प्रादुर्भावामुळे शेतकरी त्रस्त
दररोज पोहण्याचे 8 फायदे पहाच
मांजरा धरण अजूनपर्यंत मृत साठ्यातच

पाऊस पडल्यानंतर अनेक विद्यार्थी काही दिवस शाळेला सुट्टी मारतात. त्यामुळे त्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. दासखेड ते वस्ती असा ३०० लोकांचा राबता याच रस्त्यावरून आहे. उन्हाळ्यात माती असल्याने रस्त्यावरून वाहन गेले की, नागरिकांच्या नाकातोंडात धूळ जाते. पावसाळ्यात रस्त्यावर चिखल होतो. याच चिखलातून शालेय विद्यार्थी, बाजारहाट, दवाखाना, दूधदुभते, भाजीपाला, खते, बी-बियाणे तसेच इतर कामांसाठी गावात ये-जा करावी लागते. या चिखलामुळे अडचण येत असून गाड्या घरसत असल्याने अपघाताच्या घटनात वाढ झाली आहे. त्यामुळे या रस्त्याचे काम करण्याची मागणी प्रवीण शिंदे यांनी केली आहे.

प्रशासनाचे मुलभूत सुविधांकडे दुर्लक्ष

प्रशासनाचे दुर्लक्ष लाडकी बहीण योजनेसाठी रविवार सुटी असूनदेखील शिबिर घेण्यासाठी जिल्हा प्रशासन धावपळ करताना दिसत आहे, तेच लोकप्रतिनिधी आणि जिल्हा प्रशासन मात्र ग्रामीण भागातील शालेय विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मूलभूत सुविधा असणाऱ्या रस्त्याच्या दुरवस्थेकडे लक्ष द्यायला तयार नाही. ही बाब अतिशय लाजिरवाणी आहे, अशी प्रतिक्रिया सामाजिक कार्यकर्ते डॉ. गणेश ढवळे यांनी दिली.

Leave A Reply

Your email address will not be published.