संत ज्ञानेश्वर उद्यानात निकृष्ट काम
– कामाची चौकशी करण्याची माजी आमदार संजय वाघचौरे यांची मागणी
छत्रपती संभाजीनगर : अनेक वषार्पासून बंद असलेल्या संत ज्ञानेश्वर उद्यानातील विविध कामासाठी आजपर्यंत २७ कोटी रु निधी प्राप्त झाला. त्यातून उद्यानातील अंतर्गत कामे सध्या सुरू असले तरी त्याचा दर्जा मात्र निकृष्ठ होत आहे. यामुळे कोटीच्या निधीची विल्हेवाट लागण्याची शक्यता दिसत आहे. पुढील टेंडर प्रक्रिया आॅनलाइन असली तरीही आॅनलाइन प्रक्रिया मॅनेज टेंडर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यामुळे कामाची चौकशी करुन उद्यान लवकर कसे सुरू करण्याची मागणी माजी आमदार संजय वाघचौरे यांनी केली आहे.
हनुमानवाडीतील रस्ता तहसीलदारांच्या पुढाकाराने मोकळा
नेत्यांच्या उष्ट्या पत्रावळ्या चाटणा-यांना मनोज जरांगे यांचा विचार पचेल का?
विरोध करा अन्यथा निरोध होईल !
पैठण येथील संत ज्ञानेश्वर उद्यानासाठी निधीतून विकास कामे सुरू आहे. या कामाला गती मिळत नसल्याने उद्यान कधी सुरू होणार यावर प्रश्न निर्माण झाला आहे. सतत च्या पाठपुराव्याने पालकमंत्री संदिपान भुमरे यांच्या माध्यमातून कोटी चा निधी तर मिळाला. विकास कामाचा दर्जा बघता पैठण मधील नागरिकांना पडला आहे. उद्यान विकास समितीचे प्रा.संतोष गव्हाणे, रमेश लिंबोरे, बजरंग काळे,बाळु आहेर यांनी उद्यानात जाऊन सुरू असलेल्या कामाची पाहणी केली. यावेळी रखडलेली कामे तात्काळ सुरू करण्याची मागणी करत कामाचा दर्जा कडे लक्ष देण्याची मागणी या समितीने केली आहे.
राजकीय पक्ष; अंधभक्त निर्मीतीचे कारखाने !
संघी पोलिटिकल किड्यानं केला ‘किडा’
३१० एकरातील उद्यान अद्यापही आहे बंदच पाठपुराव्याने संदिपान भुमरे यांच्या माध्यमातून उद्यानातील विकास कामासाठी निधी उपलब्ध झाला. मात्र ज्या वेगाने कामे होणे आवश्यक होते, त्या वेगाने कामे होत नाही. यामुळे उद्यान सुरू करण्यासाठी विशेष प्रयत्न व त्या वेगाने कामे होताना दिसत नसल्याचा आरोप उद्यान विकास समितीच्या वतीने करण्यात आला आहे. यात कोटीचा निधी देऊन जी कामे झाली. त्याच्या दर्जा वर प्रश्न निर्माण झाला. सबंधित ठेकेदाराना सुचना देऊन कामे चांगली करुन घेतली जातील, अशी प्रतिक्रीया जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता प्रशांत जाधव यांनी दिली.
‘नको आम्हाला कलम ३७०, रिंगणात पाहिजेत उमेदवार १०७०’
नरु सेठचा परिवार म्हणजे ‘पाॅर्न साईड बघणारे टोळके!