केज तालुक्यात अनेक प्रकल्प व तलाव मृत साठ्यात

२७ गावांच्या योजना अडचणीत आल्याने टंचाईचे संकट येण्याची शक्यता

0

केज तालुक्यात अनेक प्रकल्प व तलाव मृत साठ्यात

– २७ गावांच्या योजना अडचणीत आल्याने टंचाईचे संकट येण्याची शक्यता

केज : यंदा पावसाळ्याच्या दोन महिन्यांच्या काळात मोठे पाऊस न झाल्याने केज तालुक्यात असलेल्या नऊ मध्यम, लघु प्रकल्पासह साठवण तलावात अपेक्षित पाणी साठा उपलब्ध न झाल्याने बहुतांश प्रकल्प व तलाव मृत साठ्यात आहेत. या प्रकल्पातून पाणी पुरवठा योजना सुरू असलेल्या २७ गावांच्या योजना अडचणीत आल्या असून भविष्यात टंचाईचे संकट येऊ नये यासाठी म्हणून येणाऱ्या काळात चांगला पाऊस पडणे गरजेचे आहे. अन्यथा मोठ्या टंचाईला सामोरे जावे लागणार आहे.

मागील वर्षी पावसाचा खंड आणि परतीच्या पावसाने हुलकावणी दिल्याने मांजरा धरणासह मध्यम, लघु, साठवण तलावासह अपेक्षित पाणी साठा झाला नव्हता. त्यामुळे मे महिना अखेर मांजरा धरण हे मृतसाठ्यात गेले होते. तर लहान – मोठे तलाव मृतसाठ्यात आणि कोरडे ही पडले होते. परिणामी पाणी पुरवठा योजना सुरळीत सुरू राहिल्या नव्हत्या. तर शेतीला पाणी न मिळाल्याने सिंचनाचा प्रश्न गंभीर बनला होता. त्याचा फटका ऊस पिकासह रब्बी हंगामाच्या पिकांना बसला होता. त्यामुळे मांजरा धरणासह लहान-मोठ्या तलावात पाणी साठा होण्यासाठी चांगल्या पावसाची अपेक्षा केली जात होती.

यंदा पेरणी योग्य पाऊस पडल्याने शेतकरी वर्ग सुखावला. त्यात वेळेवर पेरण्या करता आल्या. नंतरच्या काळात पाऊस ही पडत राहिल्याने पिके चांगल्या प्रकारे वाढली आहेत. मात्र गतवर्षीच्या अल्प पावसाने पाणी पातळी खोलवर गेल्याने यंदा पडलेल्या पावसाचे पाणी जमिनीत मुरले असून लहान – मोठ्या तलावापर्यंत पाणी वाहून न गेल्याने दोन महिन्यांच्या पावसाळ्याच्या कालावधीत तालुक्यातील मध्यम-लघु प्रकल्प मृत साठ्यातून बाहेर आले नाहीत.

तालुक्यातील नऊ प्रकल्पांतून २७ गावांना पाणी पुरवठा केज तालुक्यातील वाघेबाभुळगाव सिंचन तलावावरून वाघेबाभुळगाव, बानेगाव, नांदूरघाट, चाकरवाडी, खडेर्वाडी, धावजेवाडी या सहा गावांना, जाधवजवळा तलावावरून जाधवजवळा, कोरेगाव, डोणगाव, शिरपुरा या चार गावांना, उंदरीच्या तलावावरून आनंदगाव, सारणी, भाटूंबा, जवळबन या चार गावांना, कारंजा तलावावरून आडस, उंदरी, चिंचपूर या तीन गावांना, जानेगाव तलावावरून बनकरंजा, जानेगाव या दोन गावांना, होळ तलावावरून होळ, लाडेवडगाव या दोन गावांना, मुलेगाव तलावावरून मुलेगावला, मस्साजोग तलावावरून मस्साजोग, शिंदी या दोन गावांना तर नाव्होली तलावावरून नाव्होली, माळेवाडी या दोन गावांना पाणी पुरवठा केला जात आहे.

भविष्यात पिण्याच्या पाण्याची टंचाई

सध्या जीवाचीवाडी व लिंबाचीवाडी क्र. १ हे दोन तलाव मृत साठ्याच्या वर असून उर्वरित ७ प्रकल्प मृत साठ्याच्या खाली आहेत. त्यामुळे या २७ गावांच्या पाणी पुरवठा योजना सध्या तरी अडचणीत आल्या आहेत. भविष्यातील पिण्याच्या पाण्याचा व सिंचनाचा प्रश्न सुटण्यासाठी येणाºया काळात मोठ्या पावसाची गरज आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.