सरकारी नोकऱ्यांमधील आरक्षणाविरोधात बांगलादेशात आंदोलन
आंदोलकांनी लावली बांगलादेशच्या मुख्य सरकारी टीव्ही चॅनल बीटीव्हीच्या मुख्यालयाला आग
सरकारी नोकऱ्यांमधील आरक्षणाविरोधात बांगलादेशात आंदोलन
-सरकारी टीव्ही चॅनल बीटीव्हीच्या मुख्यालयाला आग Bangladesh students news
नवी दिल्ली: बांगलादेशात सध्या हाहाकार सुरू असून सरकारी नोकऱ्यांमधील आरक्षणाविरोधात सुरू असलेले आंदोलन आता उग्र बनले आहे. गुरुवार रोजी संध्याकाळी आंदोलकांनी बांगलादेशच्या मुख्य सरकारी टीव्ही चॅनल बीटीव्हीच्या मुख्यालयाला आग लावली. याशिवाय या हिंसाचारामुळे जवळपास २५ जणांचा मृत्यू झाला आहे.
पंतप्रधान शेख हसीना यांनी आजच बीटीव्हीला मुलाखत दिली होती. यानंतर सरकारी टीव्ही चॅनल बीटीव्ही कार्यालयास लावलेल्या आगीने कार्यालयात असलेले अनेक लोक अजूनही आत अडकले आहेत. या कार्यालयातील एका कर्मचाऱ्यांच्या म्हणण्यानुसार शेकडो आंदोलक संध्याकाळी बीटीव्ही ऑफिस कॅम्पसमध्ये घुसले आणि ६० हून अधिक वाहनांना आग लावली.
१ हजारहून अधिकजण जखमी
या आंदोलनामध्ये विद्यार्थी आणि पोलिसांमध्ये हिंसक चकमक झाली. या हिंसाचारात किमान २५ जणांचा मृत्यू झाला आहे. याशिवाय १००० हून अधिक लोक जखमी झाले आहेत. आंदोलन सुरू झाल्यापासून आतापर्यंत ३२ जणांचा मृत्यू झाला आहे.