घाटीतील नर्सिंग कॉलेजमध्ये रॅगिंगची घटना

- झालेल्या चौकशी समितीच्या अहवालातून स्पष्ट

0

घाटीतील नर्सिंग कॉलेजमध्ये रॅगिंगची घटना

– झालेल्या चौकशी समितीच्या अहवालातून स्पष्ट

छत्रपती संभाजीनगर : घाटीतील नर्सिंग कॉलेजच्या ९ सीनियर्स विद्यार्थ्यांनी १९ ज्युनियर विद्यार्थ्यांना शनिवारी सकाळी ११.३० वाजता पाणचक्की येथील होस्टेलमध्ये बोलावून रॅगिंग केली. रॅगिंग झाल्याचे चौकशी समितीच्या अहवालातून स्पष्ट झाले.

कॉलेजकडून रॅगिंगचा अहवाल आला. हा अहवाल अँटी रँगिंग समितीसमोर ठेवला आहे. यात ८ ते ९ जणांची नावे पुढे आली आहेत. या समितीची चौकशी झाल्यानंतर दोषींवर कारवाई करणार आहोत. तत्पूर्वी त्या विद्यार्थ्यांची भेट घेत चौकशी केल्याचे घाटी रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. शिवाजी सुक्रे यांनी सांगितले.

घाटी येथील नर्सिंग कॉलेजने हा अहवाल सोमवारी अधिष्ठातांना सादर केला, तर अधिष्ठातांनी तो अँटी रॅगिंग समितीसमोर ठेवला आहे. यासंदर्भात कॉलेज प्रशासनाकडे चौथ्या सेमिस्टरच्या विद्यार्थ्यांनी तक्रार केली होती. प्रभारी प्राचार्या भारती पिंपळकर यांनी तातडीने चौकशी समिती नेमली. समितीचा अहवाल अधिष्ठाता डॉ. शिवाजी सुक्रे यांनी अँटी रॅगिंग समितीच्या अध्यक्षा डॉ. सईदा अफ्रोज यांना दिला. अँटी रॅगिंग समितीच्या अहवालानंतर दोषी विद्यार्थ्यांवर कारवाई केली जाणार आहे.

होस्टेलमध्ये बोलावून शिवीगाळ

अवयवदान रॅलीत शनिवारी चौथ्या व पाचव्या सेमिस्टरच्या विद्यार्थ्यांत वाद झाला. त्यानंतर चौथ्या सेमिस्टरच्या १९ विद्यार्थ्यांना ९ सीनियर्सनी होस्टेलमध्ये बोलावून शिवीगाळ केली, गाणे म्हणायला लावले. त्यांचे मोबाइल बंद करून मारहाण केली. त्यानंतर पीडितांनी कॉलेजकडे तक्रार केली, असे चौकशीतून समोर आले.

Leave A Reply

Your email address will not be published.