भारताच्या माननीय राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मु यांचा महाराष्ट्र दौरा लांबणीवर
लातूर: भारताच्या माननीय राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मु यांच्या हस्ते मंगळवार, ३० जुलै, २०२४ रोजी उदगीर येथील बुद्ध विहाराचे उद्घाटन होणार होते. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू येत्या २८ ते ३० तारखेपर्यंत तीन दिवसीय महाराष्ट्र दौऱ्यावर येण्याचे आयोजित होते. या आयोजनामध्ये कोल्हापूर, पुणे-मुंबईसह मराठवाड्यात लातूर आणि नांदेड शहरातील कार्यक्रमांमध्ये त्या उपस्थित राहण्याचे आयोजन होते.
यूट्यूबर ध्रुव राठीविरोधात गुन्हा दाखल
सिंगापूरचा पासपोर्ट जगात सर्वात शक्तिशाली तर भारताला ८२ वे स्थान
अर्थसंकल्पात सूडभावनेतून महाराष्ट्राला वगळले
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या मराठवाड्यातील लातूर जिल्ह्यातील उदगीर येथे बौद्ध विहाराच्या उद्धाटन समारंभास उपस्थित राहणार होत्या. लातूर जिल्हाधिकारी कार्यालयात प्रशासनाची यासंदर्भात बैठक घेतली होती. प्रशासनाने संपूर्ण तयारीही केली होती.
२८ जुलैला कोल्हापूरातील महालक्ष्मीच्या मंदिरात त्या दर्शन, त्यानंतर लिज्जत पापड कंपनीच्या गोल्डन जुबिली वर्षानिमित्त आयोजित कार्यक्रमाला वारणानगर येथे उपस्थित राहणार होत्या. विशाळगड प्रकरणानंतर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची कोल्हापूरातील उपस्थिती महत्वपूर्ण मानण्यात येत होती.
मात्र, माननीय राष्ट्रपती महोदया यांचा पूर्वनियोजित महाराष्ट्र दौरा काही अपरिहार्य कारणास्तव पुढे ढकलण्यात आल्याचे राष्ट्रपती भवन, नवी दिल्ली येथून कळविण्यात आले आहे. परिणामी उदगीर येथील बुद्ध विहार उद्घाटनाचा कार्यक्रमही पुढे ढकलण्यात आला असल्याचे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.