येरवड्यातील पूरग्रस्त कामगारांना रेशन किट
नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीमुळे शहरातील मुळा-मुठा नदीकाठच्या परिसरात पाणी शिरले होते. त्यामुळे हातावर पोट असलेल्या कष्टकरी घटकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. उपजीविका भागविणे अतिशय कठीण झाल्यामुळे त्यांना रेशन किट ची आवश्यकता होती. गरज लक्षात घेऊन सामाजिक संस्था लोकायत संघटनेच्या वतीने ॲड. मोनाली अर्पणा व प्रोफेसर स्वप्नील फुसे यांनी लोकसहभाग मिळविला आणि येरवड्यातील पूरग्रस्त भागातील कचरावेचक कामगारांना रेशनकीट उपलब्ध करून दिला. या कीटमध्ये स्वयंपाकासाठी लागणाऱ्या जवळपास सर्वच आवश्यक वस्तूंचा समावेश आहे.