शिवछत्रपतींच्या नाटकासाठी तुरुंगात जायला तयार
– मनोज जरांगे पाटील यांचा देवेंद्र फडणवीस यांना
जालना : ‘शिवछत्रपतींच्या नाटकासाठी मी तुरुंगात जायला तयार आहे’, असं म्हणत मनोज जरांगे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. नाट्यनिर्मात्यांची फसवणूक केल्याप्रकरणी न्यादंडाधिकारी ए.सी बिराजदार यांनी अटक वॉरंट जारी केलं आहे. त्यानंतर जरांगे यांनी प्रतिक्रिया दिली. यावेळी मनोज जरांगे ते म्हणाले की, सांस्कृतिक मंत्रालय हे पैसे भरू शकत नाही का? असा प्रश्न उपस्थित केला.
मनोज जरांगेंचे उपोषण स्थगित 13 ऑगस्टपर्यंतची डेडलाईन
देशद्रोहाचा खरा चेहरा…!
अर्थमंत्री अजित पवार आणि संकटमोचक गिरीश महाजन यांच्यात वाद? मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचेकडून पांघरून टाकण्याचे प्रयत्न
यावेळी जरांगे म्हणाले की, आम्ही जे केलं ते प्रमाणिकपणे जनजागृतीसाठी केलं, कारण तो सांस्कृतिक कार्यक्रम आहे. त्यामुळे शिवछत्रपतींच्या नाटकासाठी मी तुरुंगात जायला तयार आहे. हजारो कोटी घोटाळा करणाऱ्यांचं अटक वॉरंट कॅन्सल होतं. मग मी छत्रपतींचं महानाट्य दाखवलं हा गुन्हा केला का? असा प्रश्न जरांगे यांनी उपस्थित केला आहे.
खुशखबर : सोन्याच्या दरात मोठी घसरण
विरोध करा अन्यथा निरोध होईल !
बीडमध्ये मल्टिस्टेटविरोधात ४ हजार ठेवीदार रस्त्यावर
यावेळी बोलताना जरांगे यांनी देवेंद्र फडणवीस यांचा कडक शब्दात समाचार घेतला. ते म्हणाले की, हे जून प्रकरण उकरून करण्यात फडणवीस यांचा हात आहे. पण मी काही चूकीचे केले नसल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. या निवडणुकीत फडणवीस यांचे राजकीय अस्तित्व संपवा असे आवाहन त्यांनी मराठा समाजादा केले. देवेंद्र फडणवीस हे न्यायालय चालवत असल्याने न्यायालयात दुप्पटी भूमिका घेत असल्याचे म्हणत त्यांनी न्यायालयाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
नेत्यांच्या कंबरेला मिठ्या मारणा-यांना हार्प काय घंटा समजणार?
धर्मग्रंथात जगण्याचे तंत्र ?
अंगार कोण अन् भंगार कोण ?
जरांगेवरील आरोप
जालन्यात सन २०१३ मध्ये शंभूराजे या नाटकाचे सहा प्रयोग आयोजित करण्यात आले होते. यामध्ये प्रत्येक प्रयोगाचे पाच लाख, असे सहा प्रयोगांसाठी तीस लाख रुपये देणार असल्याचे आयोजकांकडून कबूल करण्यात आले होते. नाट्यनिर्मात्यांनीही त्याला सहमती दिली. पण प्रयोगाचे पूर्ण पैसे नाट्यनिर्मात्यांना देण्यात आले नसल्याचा आरोप करण्यात आला असून मनोज जरांगे यांच्यासह अर्जुन प्रसाद जाधव आणि दत्ता बहीर यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नेत्यांच्या उष्ट्या पत्रावळ्या चाटणा-यांना मनोज जरांगे यांचा विचार पचेल का?
राजकीय पक्ष; अंधभक्त निर्मीतीचे कारखाने !