पिकांची नोंद E-Peek Pahani अॅपमध्ये करा
-तहसिलदार डॉ. सारीका भगत यांचे आवाहन
जाफराबाद : तालुक्यातील सर्व शेतकरी खातेदारांनी आपल्या शेतात लागवड केलेल्या पिकांची नोंद E-Peek Pahani अॅपमध्ये करण्याचे आवाहन तहसिलदार डॉ. सारीका भगत यांनी केले आहे. शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी Online नोंद करणे आवश्यक असून यासाठी १ ते १५ सप्टेंबर अशी मुदत देण्यात आलेली आहे. यामुळे मुदतीत नोंदणी करावी, असेही डॉ. भगत म्हणाल्या.
मोर्चाची परवानगी नाकारल्यानंतरही मोर्चा काढणारच
आजचा मराठा हा मुळचा कुणबी; कुणबी आणि मराठा वेगळे नाहीत – डाॅ. श्रीमंत कोकाटे
आरक्षणातून क्रीमी लेयर वगळण्याच्या निर्णयावर चर्चा करण्यासाठी काँग्रेसची बैठक
१ ऑगस्ट पासून १५ सप्टेंबर पर्यंत शेतकऱ्यांना नोंदणी करता येणार आहे. त्यानंतर तलाठी स्तरावरील पीक पाहणी नोंदणी सुरु होणार आहे. ती १५ आक्टोबर पर्यंत करता येईल . मुदतीत जे शेतकरी E-Peek Pahani करु शकणार नाहीत त्यांना पीक विमा, पिक कर्ज, नुकसान भरपाई आदी सारख्या योजनांचे लाभ मिळण्यास अडचण निर्माण होऊ शकते.
गावोगावी जावून जनजागृती
पीक विमा, पी. एम. किसान सन्मान योजना, सोसायटी किंवा बँकेकडून पीक कर्ज मिळवणे, अतिवृष्टी, गारपीट नुकसानभरपाई, कांदा अनुदान आदी अनेक शासकीय योजनांचा लाभ मिळवण्यासाठी E-Peek Pahani आवश्यक आहे. नोंद न केल्यास सदर जमीन पडीक म्हणून नोंद होते. त्यामुळे पिक पाहणीचे महत्व पटवून देत महसूल विभागाकडून ठिकठिकाणी माहितीपत्रके, भीतीपत्रके व सोशल मीडिया तसेच गावोगावी जावून जनजागृती केली जात आहे.