विधानसभा निवडणुकीत निष्ठावंतांना उमेदवारी दिली तरच मागे राहू

-खुलताबाद मतदारसंघातील कार्यकर्त्यांचा मविआला इशारा

0

विधानसभा निवडणुकीत निष्ठावंतांना उमेदवारी दिली तरच मागे राहू

-खुलताबाद मतदारसंघातील कार्यकर्त्यांचा मविआला इशारा

गंगापूर : आगामी विधानसभा निवडणुकीत सर्व पक्षाकडून तयारी सुरू केली असताना गंगापूर- खुलताबाद मतदारसंघात महाविकास आघाडीतील निष्ठावंत कार्यकत्यार्ला उमेदवारी दिली तरच त्यांच्या मागे उभे राहू, अन्यथा वेगळा मार्ग निवडावा लागेल, असा इशारा दोन्ही तालुक्यांतील इच्छुकांनी पत्रकार परिषदेत दिला.

महाविकास आघाडीतील काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या इच्छुक उमेदवार व प्रमुख पदाधिकाºयांच्या उपस्थितीत पत्रकार परिषद झाली. या वेळी कृष्णा पाटील डोणगावकर, किरण पाटील डोणगावकर, डॉ. ज्ञानेश्वर नीळ, दिनेश मुथा, विश्वजित चव्हाण, विलास चव्हाण यांची उपस्थिती होती. या वेळी या तिन्ही पक्षांच्या वरिष्ठांनी पक्षाबाहेरील आयात व्यक्तीला उमेदवारी देऊ नये, केवळ निष्ठावंत पदाधिकाºयांचाच उमेदवारी देण्यासाठी विचार करावा, अशी मागणी करण्यात येणार असल्याचे सांगितले. या वेळी लक्ष्मण सांगळे, वाल्मीक सिरसाठ, अविनाश पाटील, विजय मनाळ, अनिल श्रीखंडे, सुनील धाडगे, सागर दळवी, महेंद्र राऊत, भाग्येश गंगवाल यांच्यासह महाविकास आघाडीतील पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

निष्ठावंतांच्या पाठिमागे उभे राहण्याचा निर्धार

गंगापूर- खुलताबाद मतदारसंघात महाविकास आघाडीच्या पत्रकार परिषदेत निष्ठावंतांच्या पाठिमागे उभे राहण्याचा निर्धार पदाधिकाºयांनी केला.

सोबत आले तर स्वागत करू

या वेळी मागील विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीकडून निवडणूक लढवलेले संतोष माने हे सध्या बीआरएसमध्ये असल्याने त्यांच्या भूमिकेबाबत प्रश्न विचारला असता महाविकास आघाडीच्या पदाधिकाºयांनी ते सोबत आले तर स्वागत करू, असे सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.