अनधिकृत जाहिरातींमुळे रजिस्ट्रारकडून मनपा अधिकाऱ्यांची कानउघाडणी
न्यायालय परिसरात शासकीय जाहिरातील लावू नका
अनधिकृत जाहिरातींमुळे रजिस्ट्रारकडून मनपा अधिकाऱ्यांची कानउघाडणी
-न्यायालय परिसरात शासकीय जाहिरातील लावू नका
छत्रपती संभाजीनगर : परिसरातील अनधिकृत जाहिरातींच्या अनुषंगाने उच्च न्यायालय रजिस्ट्रारने सोमवारी महापालिका अधिकाऱ्यांची कानउघाडणी केली. यावेळी न्यायालय परिसरात शासकीय योजनांखेरीज इतर कोणत्याही जाहिरातील लावू नका, असे निर्देश दिल्याने न्यायालय परिसरातील ३२ होर्डिंग मनपाने काढून घेतल्या. या भागातील जाहीरातीच्या होर्डिंग काढून घेतल्या मात्र मनपाने यावेळी कोणतीही कारवाई केलेली नाही.
मनपाच्या गलथान धोरणाचा गैरफायदा घेत शहरात अनधिकृत होर्डिंगचे पेव वाढले आहे. यामुळे मनपाचा महसूल बुडण्यासह शहराचे विद्रूपीकरण होताना दिसत आहे. मात्र अशा जाहिरातबाजांवर मनपाकडून कोणतीही कारवाई होत नाही. होर्डिंगबद्दल हायकोर्टाच्या रजिस्ट्रारने निर्देश दिले. मनपाने कोर्ट परिसरातील ३२ होर्डिंग काढले. मात्र यावर मनपाकडून कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. यावेळी एका राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून अधिकारी, कर्मचाºयांना अरेराव केली. याप्रकरणी गुन्हे दाखल करणार आहोत, असे मनपाचे अतिरिक्त आयुक्त संतोष वाहुळे यांनी सांगितले.
शहरातील उच्च न्यायालय परिसरात असलेल्या हॉटेल्समध्ये राजकीय नेत्यांचा मुक्काम असतो. त्यामुळे कार्यकर्त्यांकडून या परिसरात मोठी जाहिरातबाजी केली जाते. ही बाब लक्षात आल्यानंतर उच्च न्यायालयाच्या रजिस्ट्रारनी मनपाच्या अधिकाºयांना बोलावून कानउघडणी करीत होर्डिंग हटवण्याचे निर्देश दिले. या परिसरात शासकीय योजना वगळता कोणत्याही होर्डिंगही न लावण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.
कंपन्यांच्या गुंतवणूकीमुळे मराठवाड्यात आर्थिक क्रांती घडेल
नवीन आणि भावी पिढ्यांमध्ये देशभक्तीची भावना कशी जागृत कराल?
भारत यावर्षीचा स्वातंत्र्य दिन 2024 77 वा की 78 वा साजरा करेल?
उच्च न्यायालयाच्या रजिस्ट्रार यांनी दिलेल्या निर्देशानंतर होर्डिंगवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या मनपा पथकाने परिसरातील होर्डिंग हटविण्यास सुरूवात केली असता या वेळी काँग्रेस कार्यकर्त्यांनी कारवाईसाठी आमच्याच होर्डिंग दिसतात का, असा प्रश्न विचारून वाद घालण्याचा प्रयत्न केल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगितले जात आहे. असे म्हणत वाद घातल्याचे मनपा अधिकारी म्हणाले.
मनपाकडून दुजाभाव
नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणूकीत काँग्रेसला मिळालेल्या यशाने महायुती धास्तावली आहे. त्यामुळे प्रशासनाच्या माध्यमातून दबाव टाकण्याचा प्रयत्न होत आहे. मनपा प्रशासनाला आमचेच बॅनर दिसले का, त्यामुळे त्यांच्याकडून केला जाणारा हा दुजाभावाचा प्रकार निंदनीय असून आम्ही त्याचा निषेध करतो, असे काँग्रेसचे शहराध्यक्ष युसूफ शेख म्हणाले.