आजपासून वंचितची आरक्षण बचाव यात्रा 

आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांची घोषणा

0

आजपासून वंचितची आरक्षण बचाव यात्रा

– आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांची घोषणा

जालना : राज्यात ओबीसी आणि मराठा आरक्षणावरुन वाद वाढत असतानाच वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी आरक्षण बचाव यात्रा काढण्याची घोषणा केली आहे. ही यात्रा उद्या २५ जुलै पासून सुरू होत आहे. या यात्रेला मुंबईतील चैत्यभूमीवरुन सुरूवात होणार आहे. या यात्रेत सहभागी होण्यासाठी प्रकाश आंबेडकर यांनी अनेक ओबीसी नेत्यांना आमंत्रीत केले आहे. या माध्यमातून समाजात सलोखा वाढविण्याचा प्रयत्न आंबेडकर करत असल्याची चर्चा असली तरी ते कितपत खरे हे सध्या तरी सांगता येत नाही.

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही यात्रा महत्त्वाची मानली जात आहे. वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी या यात्रेत सहभागी होण्याची आवाहन केले आहे. यासाठी आंबेडकरांनी शरद पवार यांना देखील पत्र लिहिले आहे. मात्र पवारांनी या संदर्भात अद्याप त्यांची भूमिका स्पष्ट केलेली नाही. या यात्रेत पवार सहभागी झाले तर मराठा समाज नाराज होण्याची शक्यता आहे. तर सहभागी झाले नाही तर ओबीसी समाज नाराज होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे पवार कोंडीत सापडले आहेत.

यात्रेचा समारोप संभाजीनगरात

वंचितचे ओबीसी आरक्षण बचाव यात्रा २५ जुलैला चैत्यभूमी, मुंबई येथून सुरू होणार असून त्याच दिवशी पुण्यातील महात्मा फुले वाड्यालाही भेट देण्यात येणार आहे. यानंतर ही यात्रा पुणे, सातारा, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, अहमदनगर, धाराशिव, लातूर, परभणी, नांदेड, हिंगोली, यवतमाळ, अमरावती, अकोला, वाशीम, बुलडाणा, जालना आणि छत्रपती संभाजीनगर येथे यात्रेचा समारोप होणार आहे.

छगन भुजबळ यांना निमंत्रण

वंचितचे प्रकाश आंबेडकर यांनी या यात्रेत सहभागी होण्यासाठी छगन भुजबळ, राष्ट्रवादीचे शरद पवार यांनाही निमंत्रित केले आहे. त्यामुळे या यात्रेत कोण कोण सहभागी होतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. याशिवाय या यात्रेने समाजातील जातीय संघर्ष कमी होईल की वाढेल हे तर येणाºया काळच ठरविणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.