आरक्षण देणार नसाल तर कोणती भाषा बोलू?
– मनोज जरांगे यांचा राज्य सरकारला सवाल
जालना : मी पुन्हा पुन्हा सांगत आहे, मला राजकारणात जायचे नाही. पण तुमचे दोन-चार जण म्हणत आहेत की मी राजकीय भाषा बोलत आहे. तुम्ही आरक्षण देणार नसलात तर मी राजकीय भाषा बोलू नको तर कोणती भाषा बोलू? तुम्ही आरक्षण द्या, राजकीय भाषा बंद करतो. पण तुम्ही आरक्षण देणार नसाल तर मग मी भाषा बोलू कोणती? असा सवाल मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी उपस्थित केला.
मला आणि समाजाला राजकारणात जायचे नाही. आमची आणखी तरी प्रामाणिक भूमिका आहे. मला त्यामध्ये ढकलू नका. मी जर गेलो तर तुम्ही बांधलेली गणितं सगळी चुकणार आहेत असे म्हणत त्यांनी मला हलक्यात घेऊ नका, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला. राजकारणात मी जर एकदा घुसलो तर परिणामाची चिंता करत नाही. मी शेतकºयांपासून १२ बलुतेदारांचे, ओबीसी, शेतकºयांचे, गोरगरिबांचे, मराठ्यांचे राज्य आणल्याशिवाय मागे सरकणार नाही. फडणवीस साहेब तुम्हाला समजून घ्यायचं असेल तर घ्या, नसेल घ्यायचं तर माझा नाईलाज आहे, असेही जरांगे म्हणाले.
कुटेंच्या बोगस कंपन्यांचे जाळे, ज्ञानराधातला पैसा थेट हाँगकाँगला
सरसकट बारकाल्या मुलांना पगार सुरू करा – भोऱ्याची मुख्यमंत्री शिंदेकडे मागणी
गुलाबी जॅकेट घालून दिसतो छान, काकाविषयी मनात घाण
तिसरी आघाडी स्थापन होणार?
माजी खासदार युवराज संभाजीराजे छत्रपती हे सोलापूर जिल्ह्यातील भोसे येथे बोलत असताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पणतू राजरत्न हेही उपस्थित होते. यानंतर ते थेट जरांगे पाटील यांच्या भेटीसाठी गेल्यानंतर दोघांमध्ये चर्चा झाली. यामुळे राजरत्न आंबेडकर व जरांगेंना सोबत घेऊन संभाजीराजे तिसरी आघाडी स्थापन करणार असल्याच्या चर्चेला उधाण आले आहे.
फडणवीसांचे गणित फेल होणार
सत्ताधाºयांनी गोरगरिबांना न्याय द्यायचा नाही ठरवले आहे. त्यामुळे गोरगरिबांनी ठरवले आहे त्यांना खुर्ची द्यायची नाही. २० तारखे पर्यंत चित्र बदललेले दिसेल. यामुळे फडणवीस यांचे गणित फेल होणार आहे. मी एकदा राजकारणात घुसलो तर परिणामाची चिंता करत नाही, असा इशारा जरांगे यांनी सरकारला दिला आहे.