आहिल्यानगरमधील वंचितच्या पदाधिकाऱ्यांचा आरपीआय आंबेडकर गटात प्रवेश
जिल्हाध्यक्षपदी नीलेश गायकवाड तर संपर्कप्रमुखपदी गलांडे यांची निवड
आहिल्यानगरमधील वंचितच्या पदाधिकाऱ्यांचा आरपीआय आंबेडकर गटात प्रवेश
जिल्हाध्यक्षपदी नीलेश गायकवाड तर संपर्कप्रमुखपदी गलांडे यांची निवड
आहिल्यानगर : वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर हे जरी एकीकडे ओबीसी आरक्षण बचाव रॅली काढत असले तरी दुसरकडे मात्र त्यांच्या वंचित आघाडीला मोठा फटका बसला आहे. त्यांच्या वंचित बहुजन युवा आघाडीचे जिल्हाध्यक्ष नीलेश गायकवाड यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी राजीनामा देऊन दीपक निकाळजे यांच्या उपस्थितीत आरपीआय आंबेडकर गटात प्रवेश केला. यावेळी आहिल्यानगर दक्षिण जिल्हाध्यक्षपदी नीलेश गायकवाड व महाराष्ट्र राज्य संपर्कप्रमुख संतोष गलांडे यांना नियुक्तीपत्रे देण्यात आले.
अदानी घेणार बुटीबोरी थर्मल पॉवर प्लांट!
उमेद महिला बचतगट अभियानातील बहिणींचे वर्षा शासकीय निवासस्थानी रक्षाबंधन
आ. संजय शिरसाटांनी विधानसभेत आंबेडकरी जनतेचे प्रश्न कधीच मांडले नाहीत -रमेश गायकवाड
वंचितच्या पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिल्यानंतर दीपक निकाळजे यांच्या उपस्थितीत आरपीआय आंबेडकर गटात प्रवेश केला. यावेळी सचिन घोडके, आबासाहेब रामफळे, अशोक मोरे, नाना सांगळे, आरपीआय आंबेडकर गटाचे युवक शहर अध्यक्ष संदीप वाघमारे, उत्तर जिल्हाध्यक्ष अमोल शिंदे आदी उपस्थित होते.
यावेळी माध्यमांशी संवाद साधताना नीलेश गायकवाड म्हणाले, की वंचित बहुजन युवा आघाडीचा राजीनामा देण्यामागे महत्त्वाचे कारण म्हणजे पक्षातील राज्य उपाध्यक्ष किसन चव्हाण व अरुण जाधव हे कार्यकर्त्यांवर अन्याय करीत आहेत. त्यामुळे पक्षाची वाढ होत नाही. वंचित बहुजन आघाडीचे नेते बाळासाहेब आंबेडकर यांना चुकीची माहिती देऊन कायम गैरसमज निर्माण करीत आहेत.
नुकत्याच काही दिवसांपूर्वी वंचित बहुजन आघाडीकडून ओबीसी आरक्षणासाठी राज्यात यात्रा काढण्यात आली होती. ही यात्रा जामखेड तालुक्यातील चौंडी येथे आली, त्यावेळी कर्जत तालुक्यातील सर्व पदाधिकारी उपस्थित असूनही जाधव यांनी पदाधिकाऱ्यांचे नाव घेणे मुद्दाम टाळले. कार्यकर्त्यांचा अपमानाला कंटाळून राजीनामा दिला. लोकसभा निवडणुकीत किसन चव्हाण व अरुण जाधव यांनी पक्षाची दिशाभूल केल्याचा आरोप नीलेश गायकवाड यांनी केला.