कांचनवाडीत बिबट्या शिरल्याची अफवा

-ठोस पुरावे सापडेपर्यंत शोधमोहीम : वन विभाग

0

कांचनवाडीत बिबट्या शिरल्याची अफवा

-ठोस पुरावे सापडेपर्यंत शोधमोहीम : वन विभाग

छत्रपती संभाजीनगर : शहरातील कांचनवाडीत सोमवारी पहाटे बिबट्या शिरल्याची माहिती वन विभागाला मिळाल्यानंतर वन विभागाच्या पथकाने धाव घेत पाहणी केली. मात्र या पथकाला बिबट्या आढळला नाही. त्यामुळे बिबट्या दिसल्याची ही अफवाच असल्याचे बोलले जात आहे. मात्र बिबट्या शहराबाहेर गेल्याचे ठोस पुरावे सापडेपर्यंत शोधमोहीम थांबवणार नाही, असे वन विभागाने स्पष्ट केले आहे.

अब्दुल सत्तार-जो पक्षसाठी काम करेल त्याला न्याय मिळेल
अर्थसंकल्प : 7.75 लाख रुपयांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त
मद्य परवाना तपासणी होत नसल्याने मद्यपींची मजा

शहरात बिबट्या दिसल्याची घटना मागील आठ दिवसांपासून सुरू आहे. त्यात उल्कानगरीचा बिबट्या प्रोझोन मॉल तर तेथून सिडको एन-१ मध्ये दिसला होता. तेव्हापासून वन विभागाने स्वतंत्रपणे मोहीम राबवून बिबट्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. या आठ दिवसांत बिबट्या सीसीटीव्हीतच दिसला. मात्र तो प्रत्यक्ष दिसला नाही नसल्याचे सांगितले जात आहे. यासाठी उल्कानगरी भागात दोन पिंजरे आणि प्रोझोन मॉल भागात सात पिंजरे लावले आहेत. बिबट्याचा शोध घेतल्यानंतर तो न मिळाल्याने जुन्नर, नाशिक येथील वन विभागाचे विशेष पथकाला परतावे लागले आहे.

नाशिक येथील पथक परत गेले असून बिबट्या पळशीच्या डोंगरात गेल्याचा अंदाज वन विभागाने व्यक्त केला होता. मात्र नागरिकांनीदेखील सावध राहावे. दिवसा चार तर रात्री तीन पथके बिबट्याचा शोध घेत आहेत. तो दिसला तर वन विभागाशी संपर्क साधावा असे आवाहन केले आहे. यावेळी फिरत्या पथकाचे प्रमुख सुशील नांदवते म्हणाले की, जोपर्यंत बिबट्या शहराबाहेर गेल्याचे ठोस पुरावे मिळत नाही तोपर्यंत शोधमोहीम सुरूच राहील.

प्रधानमंत्री आवास योजनेबाबत मोठी घोषणा
‘पंतप्रधान सूर्यघर मोफत वीज’ योजनेबाबत मोठी घोषणा

बिबट्या दिसल्याचा खोडसाळपणा

कांचनवाडी येथे बिबट्या दिसल्याची अफवा कुणीतरी खोडसाळपणे पसरवली होती. त्यामुळे आता अशा अफवा पसरवणाºयांवर वन विभागाने थेट गुन्हा दाखल करावा, असे माजी महापौर नंदकुमार घोडेले म्हणाले.

Leave A Reply

Your email address will not be published.