श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रांत पावसासाठी सहस्रधारा अभिषेक

-कृषी अधिकारी विकास पाटील आरती

0

श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रांत पावसासाठी सहस्रधारा अभिषेक

-कृषी अधिकारी विकास पाटील आरती

छत्रपती संभाजीनगर : जूनच्या सुरूवातील रिमझिम पाऊस पडला मात्र त्यानंतर जुलैअखेरपर्यंत अद्याप पावस समाधानकारक न पडल्याने मराठवाड्यातील शेतकरी चिंतातूर झाल्याचे दिसत आहे. या पार्श्वभूमीवर गुरुपौर्णिमेचे निमित्त साधून मराठवाड्यात भरपूर पर्जन्यवृष्टी व्हावी यासाठी १२२ श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रांत स्वामींच्या उत्सव मूर्तीवर पर्जन्यसूक्त व सहस्रधारा अभिषेक करण्यात आला. यावेळी कृषी विकास अधिकारी प्रकाश पाटील, कन्नडचे कृषी अधिकारी विकास पाटील यांच्या उपस्थितीत आरती केली.

पर्यावरण जनजागृतीसाठी इको क्लबची स्थापना
चिकलठाण्यात गांजा विक्री करणाऱ्यांना अटक

जिल्ह्यात १२२ श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रांमध्ये गुरुपौर्णिमेचा उत्सव साजरा करण्यात आला. शहरातील हडको एन-९ स्वामी समर्थ सेवा केंद्रात सकाळी पवमान, श्रीसूक्त, पुरुषसूक्त अभिषेक आणि मराठवाड्यात समाधानकारक पाऊस व्हावा यासाठी पर्जन्यसूक्त अभिषेक करण्यात आला. या उत्सवात सुमारे ४ लाख भाविकांनी सहभाग घेतला. त्यामध्ये ७० टक्के महिला व ३० टक्के पुरुषांचा समावेश होता. गेल्या वर्षीच्या तुलनेत भाविकांची संख्या ५० हजारांनी जास्त होती. यावेळी श्री स्वामींच्या पितळी धातूच्या उत्सवमूर्तीवर सहस्रधारा अभिषेक केला. या वेळी भाविकांनी पाऊस चांगला पडू दे… अशी प्रार्थना केली.

अर्थसंकल्पीय अधिवेशन: खासगी क्षेत्रावर सरकारचे विशेष लक्ष
NEET2024: १ लाख लोकसंख्येमागे एमबीबीएसच्या १० जागा आवश्यक

स्वामींच्या मूर्तींवर पंचामृताचा अभिषेक

जिल्ह्यातील १२२ केंद्रांवर गेल्या वर्षी साडेतीन लाख भाविक होते. त्यात सिडको एन-९ येथील स्वामी समर्थ केंद्रावर भाविकांच्या उपस्थितीत पूजन केले. स्वामींच्या ४ मूर्तींवर पंचामृताचा भाविकांनी अभिषेक केला. यंदा आलेल्या भाविकांची संख्या सुमारे ४ लाख होती, अशी माहिती शशी पाटील यांनी दिली.

Leave A Reply

Your email address will not be published.