आंतरवालीचे सरपंच पांडुरंग तारकची तुळजापूर तहसील कार्यालयात धाव
-रेकॉर्ड रुममध्ये कागदपत्रांची तासभर शोधाशोध
आंतरवालीचे सरपंच पांडुरंग तारकची तुळजापूर तहसील कार्यालयात धाव
-रेकॉर्ड रुममध्ये कागदपत्रांची तासभर शोधाशोध
जालना : मराठा आंदोनाचे केंद्र असलेल्या आंतरवाली सराटी या गावाचे सरपंच पांडुरंग तारक यांनी तुळजापूर तहसील कार्यालयात धाव घेत कागदपत्रांची शोधाशोध केली. सरपंच तारक यांचे पूर्वज मुळ तुळजापूरचे असून २०० वर्षांपूर्वी आंतरवाली सराटी येथे गेल्याचे सांगण्यात येत आहे. यावेळी त्यांनी तासभर रेकॉर्ड रुममध्ये कागदपत्रांची शोधाशोध केली परंतु कागदपत्र सापडली नाहीत.
एकनाथ शिंदे दुतोंडी मांडूळ – उध्दव ठाकरे यांची बोचरी टीका
बांगलादेश मधील हंगामी सरकारचे खातेवाटप
राज ठाकरेंच्या दौ-यात ऑल इंडिया पॅथर सेनेकडून ‘आरक्षण विरोधी चले जाओ’ ची बॅनरबाजी
मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील हे आंतरवाली सराटी येथेच करतात. मागील वर्षभरापासून आंतरवाली सराटी गाव त्यामुळे चर्चेत आहे. याच आंतरवाली सराटी येथील सरपंच पांडुरंग तारक, ग्रामपंचायत सदस्य अनंत तारक, अनिल तारक, विजय तारक, संतोष कचरे, संभाजी पवार यांनी तासभर तहसील कार्यालयातील रेकॉर्ड रुममध्ये त्यांच्या मूळ कागदपत्रांची शोधाशोध केली. यावेळी रेकॉर्ड रुममधील काळे, प्रवीण सावंत यांनी कागदपत्र शोधण्यास मदत केली. यावेळी प्रहार संघटनेचे जिल्हाध्यक्ष महेश गवळी कार्यकर्त्यांसह उपस्थित होते.
आंतरवाली सराटीचे सरपंच व इतर मंडळी आली होती. त्यांनी ते मुळचे तुळजापूरचे असल्याचे सांगितले. रेकॉर्ड रुममध्ये कागदपत्र शोधले. परंतु ५० वर्षांपूर्वीची कागदपत्र तहसील कार्यालयात नसून ती भूमी अभिलेख कार्यालयात असल्याचे त्यांना सांगितले, असे तहसीलदार अरविंद बोळंगे यांनी सांगितले.
यावेळी आंतरवाली सराटीचे सरपंच पांडुरंग तारक म्हणाले की, आमच्या आजोबा, पणजोबांकडून आम्हाला आपण मूळचे तुळजापूरचे असल्याचे सांगण्यात आले. त्यांना त्यांचे आजोबा, पणजोबांनी सांगितले होते. त्यामुळे आमची जुनी कागदपत्र मिळतात का, त्याचा शोध घेतला.