पत्रकारांच्या विकासासाठी स्वतंत्र आर्थिक विकास महामंडळ स्थापन करा

-महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे यांची मागणी

0

पत्रकारांच्या विकासासाठी स्वतंत्र आर्थिक विकास महामंडळ स्थापन करा

-महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे यांची मागणी

छत्रपती संभाजीनगर : पत्रकारांच्या विकासासाठी स्वतंत्र आर्थिक विकास महामंडळ स्थापन करून त्या माध्यमातून पत्रकारांना मानधन व इतर सवलती द्याव्यात, अशी मागणी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे यांनी केली. ते महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या वतीने आयोजित दिक्षाभूमी ते मंत्रालय या पत्रकार संवाद यात्रेच्या दुसºया टप्प्याच्या शुभारंभ प्रसंगी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी सरचिटणीस डॉ. विश्वास आरोटे, विभागीय अध्यक्ष वैभव स्वामी, जिल्हाध्यक्ष डॉ. प्रभू गोरे, शहराध्यक्ष अनिल सावंत आदी मान्यवर उपस्थित होते.

पत्रकारांच्या विकासासाठी स्वतंत्र आर्थिक विकास महामंडळ स्थापन करा:
बाळशास्त्री जांभेकर निवृत्ती योजनेत पत्रकारांसाठी असलेल्या जाचक अटी रद्द करून शासनाच्या घोषणेप्रमाणे प्रति महिना २० हजार रुपये मानधन देण्यात यावे. तसेच पत्रकार संरक्षण कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी स्थानिक पोलीस प्रशासनाला स्वतंत्र आदेश द्यावेत. पत्रकार व त्यांच्या कुटुंबीयांना मोफत आरोग्य उपचार आणि विमा कवच द्यावे. याशिवाय अधीस्वीकृती पत्रिका पत्रकारांना मिळण्यासाठी प्रक्रिया सुलभ करून ग्रामीण भागातील पत्रकारांसाठी वेतन पावतीची अट रद्द करावी अशी मागणी पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे यांनी केली.

राज्यातील शासकीय जमीन म्हाडाला देऊन पत्रकारांसाठी जिल्हा व तालुका स्तरावर स्वतंत्र घरकुल योजना राबवावी, शासनाच्या राज्य, जिल्हा, तालुकास्तरीय शासकीय समित्यांवर पत्रकारांच्या एका प्रतिनिधीला संधी देण्यात यावी. तसेच भारतीय राज्यघटनेतील तरतुदी प्रमाणे राष्ट्रपती नियुक्त राज्यसभेत आणि राज्यपाल नियुक्त विधान परिषदेत पत्रकारांमधून प्रतिनिधित्व देण्यात यावे, अधीक्षकृती धारक पत्रकारांना रेल्वे, विमान, स्लीपर कोच व बस प्रवासात सवलत मिळावी. याशिवाय अधीस्वीकृती धारक पत्रकारांच्या वाहनांना महामार्गावर टोलमाफी द्यावी, पत्रकारांच्या पाल्यांना उच्च व परदेशी शिक्षणासाठी विशेष सवलत देण्यात यावी, शासकीय जाहिरातीच्या दरात महागाईच्या तुलनेत दर २ वर्षांनी वाढ करावी, अशी मागणी मुंडे यांनी केली.

पत्रकारांसाठी स्वतंत्र मतदारसंघ करा

मतदार संघ पुनर्रचनेत शिक्षक पदवीधर यांच्याप्रमाणे पत्रकारांसाठी स्वतंत्र मतदारसंघ निर्माण करावा अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या. या पत्रकार परिषदेनंतर पत्रकारांनी उपस्थित केलेला विविध प्रश्नांना मुंडे यांनी समर्पक उत्तरे देऊन त्यांच्या शंकांचे निरसन केले.

Leave A Reply

Your email address will not be published.