शरद पवार ओबीसी आणि मराठ्यांमध्ये भांडण लावत आहेत

-लक्ष्मण हाके यांची पवारांवर टीका

0

शरद पवार ओबीसी आणि मराठ्यांमध्ये भांडण लावत आहेत

-लक्ष्मण हाके यांची पवारांवर टीका

बीड : आमच्या एसटीच्या आरक्षणासाठी चार पिढ्या खपल्या आणि आता शरद पवार म्हणत आहेत आमचा पाठिंबा आहे. शरद पवार ओबीसी आणि मराठ्यांमध्ये भांडण लावत आहेत. यामुळे त्यांनी आपली भूमिका स्पष्ट करावी, असे लक्ष्मण हाके म्हणाले आहेत. ते गेवराई येथे ओबीसी आरक्षण बचाव जन आक्रोश यात्रेत बोलत होते.

बीडमध्ये मल्टिस्टेटविरोधात ४ हजार ठेवीदार रस्त्यावर
शरद पवार ओबीसी आणि मराठ्यांमध्ये भांडण लावत आहेत

यावेळी लक्ष्मण हाके म्हणाले की, शरद पवार साहेबांनी पुरोगामी भूमिका घ्यायला पाहिजे, त्यांच्या तोंडी नेहमी शाहू फुले आंबेडकरांचे नाव असते. जरांगे ज्यावेळी आम्ही आणि धनगर भाऊ भाऊ आहे असे म्हणतात. त्याचवेळी शरद पवार संधी साधतात. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्यानंतरही शरद पवार का बोलतं नाहीत, ते का मूग गिळून गप्प आहेत. मुख्यमंत्र्याकडे मीटिंगला जाऊन शरद पवार फक्त पोहे खाऊन आले का? गावगाडा विस्कळीत होत असताना बोलत नाहीत, हे न कळलेलं कोड आहे, असे हाके म्हणाले.

बारामतीमध्ये शरद पवार पिवळा रुमाल घालून, अहिल्यादेवी होळकर यांच्या कार्यक्रमात जावून, धनगरांच्या एसटी आंदोलनाला माझा पाठिंबा आहे, असे सांगतात. पण आमच्या चार पिढ्या या आंदोलनासाठी खपल्या असताना त्यावेळी त्यांची काहीच भूमिका नाही. त्यांनी आमच्यामध्ये भांडण लावू नये, असेही हाके म्हणाले.

अर्थसंकल्प : 7.75 लाख रुपयांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त
एंजल टॅक्सबाबत मोठी घोषणा

भुजबळ आणि दरेकरांचे रक्त एकच

मराठा समाजाने ७/ १२ जरांगे यांच्या नावावर केला आहे का? अशी टीका दरेकर यांनी केली होती. त्यावर मनोज जरांगे यांनी संतप्त प्रतिक्रिया देताना म्हटले की, छगन भुजबळ आणि प्रवीण दरेकरांचे रक्त एकच आहे. छगन भुजबळ यांची भाषा देखील दरेकर त्यांच्यासारखीच होती. एकदा उपोषण होउदे, मग सर्वांचा हिशोब घेतो, असा इशारा त्यांनी दिला.

कुणबी प्रमाणपत्र द्या

मराठ्यांना आरक्षण फक्त एकनाथ शिंदे साहेबच देऊ शकतात. आरक्षण लवकर द्या, उशीर करू नका. समाजाच्या हाल अपेष्टा झाल्यानंतर आरक्षण देऊ नका. सरकारने जात वैधता प्रमाणपत्रबाबत सहा महिन्याचा निर्णय घेतला असेल तर मुख्यमंत्र्यांचे मनापासून अभिनंदन आहे. ज्या मराठ्यांची नोंद सापडेल त्यांना कुणबी प्रमाणपत्र द्या. मात्र हा निर्णय लवकर घ्यावा, असे जरांगे म्हणाले.

Leave A Reply

Your email address will not be published.