शरद पवार घेणार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट, काय आहे प्रकरण?
संपूर्ण महाराष्ट्रात एकच खळबळ
शरद पवार घेणार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट, काय आहे प्रकरण?
संपूर्ण महाराष्ट्रात एकच खळबळ
राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष शरदचंद्र पवार हे सोमवारी दिनांक २२ जुलै रोजी दुपारी ३ वाजता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार त्यापूर्वीच संपूर्ण महाराष्ट्रात एकच खळबळ उडाली आहे. मराठा आरक्षण विषय, राज्यातील शेतकऱ्यांच्या वाढत्या आत्महत्या आणि दुध उत्पादक शेतकर्यांना दुधाचा वाढीव भाव यावर शरद पवार हे मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार आहेत असे सूत्रांच्या माध्यमातून माहिती मिळाली आहे.
राज्य सरकारच्या अहवालानुसार शेतकऱ्यांच्या आत्महत्येची आकडेवारी
महाराष्ट्रात शेतकऱ्यांच्या वाढत्या आत्महत्या हि चिंतेची बाब बनली आहे. तसेच यावर काय उपाय योजना करता येईल. याबाबत चर्चा या भेटीत होणार आहे. महाराष्ट्रात २०२४ मध्ये जानेवारी ते जून या सहा महिन्यांत एकूण १२६७ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. १२३७ पैकी ५५७ शेतकरी आत्महत्या या विदर्भ विभागातील अमरावती येथील आहेत. राज्य सरकारच्या या सहा महिन्यांच्या आकडेवारीनुसार छत्रपती संभाजीनगर विभाग दुसऱ्या क्रमांकावर असून येथील ४३० शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. तसेच नाशिक विभागात १३७ आत्महत्या, नागपूर विभागात १३० आणि पुणे विभागात १३ शेतकऱ्यांच्या आत्महत्येची नोंद आहे. मात्र कोकण विभागात एकाही शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची नोंद नाही.
NCRB च्या अहवालानुसार शेतकऱ्यांच्या आत्महत्येची आकडेवारी
नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरो यांच्या अहवालानुसार २०२० मध्ये कृषी क्षेत्राशी संबंधित एकूण १०६७७ व्यक्तींनी आत्महत्या केल्या. यामध्ये ५५७९ शेतकरी आणि ५०९८ शेतमजुरांचा समावेश आहे. संपूर्ण देशभरातील नोंदवलेल्या आत्महत्यांपैकी हे प्रमाण ७% इतके होते.
२०२१ च्या अहवाला नुसार, १०८८१ कृषी क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांनी आत्महत्या केल्या आहेत, त्यातील ५३१८ हे शेतकरी होते आणि ५५६३ हे शेतमजुर आहेत. त्यापैकी ३७.३% आत्महत्या महाराष्ट्रात झाल्या आहेत.
NCRB च्या आकडेवारीनुसार, २०२१ मध्ये एकूण १६४०३३ लोकांनी आत्महत्या केल्या आणि आत्महत्या केलेल्यांपैकी ६.६ % लोक शेतीच्या कामात गुंतलेले होते.
एनसीआरबीने म्हटले आहे की २०२२ मध्ये, कृषी क्षेत्राशी संबंधित ११२९० लोकांनी आत्महत्याच्या घटना घडल्या, त्यापैकी ५२०७ शेतकरी आणि ६०८३ शेतमजूर होते. देशातील एकूण आत्महत्यांपैकी हे प्रमाण ६.६% इतके आहे.
नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरो यांच्या २०२२ च्या अहवाला नुसार, देशातील शेतकऱ्यांच्या एकूण आत्महत्यांपैकी ३७.६ % शेतकऱ्यांच्या आत्महत्या या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या आहेत. म्हणजे संपूर्ण भारतात आत्महत्यांचे प्रमाण महाराष्ट्रात सर्वाधिक आहे. हि अत्यंत चिंतेची बाब आहे.
देशाच्या सकल देशांतर्गत उत्पादनात (जीडीपी) महाराष्ट्राचे योगदान सर्वाधिक आहे. तरीही महाराष्ट्रात इतके आत्महत्या प्रकरण आहेत या विषयावर शरदचंद्र पवार हे मुख्यमत्री एकनाथ शिंदे यांच्याशी समक्ष भेट घेऊन यावर काय उपाय योजना करता येईल चर्चा करणार आहेत.