महाराष्ट्रसह पूर्ण देशामध्ये 22 जुलै 2024 ते 28 जुलै 2024 या कालावधीमध्ये शिक्षण सप्ताह
काय आहे शिक्षण सप्ताह-२०२४-२०२५ उपक्रम, विभागीय शिक्षण उपसंचालक डॉ. गणपतराव मोरे यांची माहिती
शिक्षण सप्ताहाचे उपक्रम काय असणार आहेत आणि लातूर विभागामधल्या शिक्षकांना, विद्यार्थ्यांना, पालकांना आपलं काय आवाहन असणार आहे?
केंद्र शासनाच्या निर्देशानुसार आणि महाराष्ट्रसह पूर्ण देशामध्ये 22 जुलै 2024 ते 28 जुलै 2024 या कालावधीमध्ये शिक्षण सप्ताहाचा आयोजन करण्यात आले आहे.
22 जुलै 2024 ते 28 जुलै 2024 या कालावधीतील सात दिवस दैनंदिन वेगवेगळे उपक्रम राबविण्यात येणार आहेत.
पहिल्या दिवशी टीचिंग-लर्निंग मटेरियल, अध्ययन-अध्यापन साहित्य तयार करण्याचे संदर्भामध्ये वर्कशॉप/कार्यशाळा आहे. विद्यार्थ्यांचे त्याच्यामध्ये सहभाग असणार आहे आणि त्यांना साहित्याचे महत्त्व पटवून देणे असा या उपक्रमाचे नियोजन आहे. विभागीय शिक्षण उपसंचालक डॉ. गणपतराव मोरे यांची माहिती.
दुसऱ्या दिवशी एफएलएम किंवा मूलभूत संख्याज्ञान व साक्षरता या संदर्भामध्ये सर्व विद्यार्थ्यांना मूलभूत गोष्टीचे ज्ञान कशा पद्धतीने मिळावं? त्यांची जी साक्षरता आहे ती कशा पद्धतीने टिकावी? या संदर्भात कार्यक्रम आहे.
तिसऱ्या दिवशी क्रीडा क्षेत्राचा आणि आरोग्य याचं जवळचा संबंध असल्यामुळे क्रीडा दिवस पाळला जाणार आहे त्याच्यामध्ये विशेषता भारतीय खेळ, लगोरी, लंगडी, आट्यापाटे आणखी वेगवेगळे देशी खेळांना प्रोत्साहन देऊन त्याचे महत्त्व सांगणे. त्या दिवशी परिसरातील खेळाडूना निमंत्रण देऊन त्यांच्या तर्फे मार्गदर्शन करणे असा या दिवसाचा उपक्रम आहे.
मुलांच्या दप्तराचे ओझे कधी कमी होणार?
आरटीई लकी ड्रॉ मुळे प्रवेश रखडले
त्यानंतर पुढच्या चौथ्या दिवशी सांस्कृतिक दिवस म्हणून साजरा केला जाणार आहे, त्याच्यामध्ये त्या परिसरात चालणारे वेगवेगळे सांस्कृतिक उपक्रम, वेगवेगळे कला, संगीत, कार्यानुभव त्याचबरोबर ग्रामीण नृत्य, नाट्य, कला यांना प्रोत्साहन देणारे उपक्रम राबवायचे आहेत.
पाचव्या दिवशी या सगळ्याबरोबरच विद्यार्थ्यांमधलं स्किल डेव्हलपमेंट झालं पाहिजे आणि जे डिजिटल क्लासरूम किंवा डिजिटल घेण्याच्या दृष्टीने तो दिवस पाळला जाणार आहे. त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांना हाताने करायचे कौशल्य बोलण्याचा असेल मार्केटिंग स्किल असे कौशल्य असेल यासंदर्भात गाईड केले जाणार आहे. या संदर्भात कार्यशाळा आयोजित केले जाणार आहे.ऑनलाईन शिक्षणाबरोबरच ऑनलाइन व्यवहार कशा पद्धतीने केले जाणार आहे.
पर्यावरणाच्या दृष्टीने इको क्लबची स्थापना आणि या इको क्लबच्या माध्यमातून जो काही आज पर्यावरणाच्या संदर्भात जागृती करण्यासाठी एक उपक्रम घेणार आहे “एक पेड मा के नाम”. प्रत्येक विद्यार्थ्यांना आपल्या आईच्या नावानं एका प्लांट वृक्षारोपण करायचा एका झाडाचं रोपण करायचं आहे.
सहाव्या दिवशी राज्य भारत सरकारने भरड धान्य दिवस साजरा केला. त्याच निमित्ताने शालेय पोषण आहारामध्ये भरड धान्याचा समावेश कशा पद्धतीने करणे, यावर कार्यशाळा होणार आहे. आणि
शेवटच्या सातव्या दिवशी कम्युनिटी पार्टिसिपेट किंवा इन्व्हॉलमेंट या माध्यमातून सामुदायिक विकास माध्यम याच्यातून कार्यक्रम केला जाणार आहे.
या संदर्भात लातूर विभागाची तयारी सर्व झालेली आहे सर्व शिक्षणाधिकारी, गटशिक्षणाधिकारी, सर्व पर्यवेक्षक यंत्रणेंना तशा सूचना दिलेल्या आहेत आणि त्यांनीही त्या पद्धतीने आपापल्या जिल्ह्यामध्ये कशा बैठका घ्यावयाचे आहेत याचे नियोजन केलेल आहे. आणि 22 ते 28 हा उपक्रम केंद्र शासनाने दिलेल्या निर्देशानुसार आणि महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण विभागाच्या मार्गदर्शनाखाली लातूर विभागांमध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीने राबवला जाणार आहे. शिक्षणाधिकारी, गटशिक्षणाधिकारी, उपशिक्षणाधिकारी, महानगरपालिका, नगरपालिका यांचे अधिकारी यांना सर्वांना सूचना दिलेले आहेत सर्वांशी प्रत्यक्षही बोलणं आहे आणि त्याच्यामुळे हा 22 तारखेपासून त्याचं परिपूर्ण नियोजन करण्याचं तयारी झालेली आहे.
तरी सर्व विद्यार्थी, पालक, समाजातील जबाबदार व्यक्ती, सामान्य नागरिक यांनी या शिक्षण सप्ताहात सहभागी होऊन या समाजोपयोगी कार्यक्रमाची शोभा वाढवावी व समाज प्रगतीत आपले योगदान द्यावे.